अल्पसंख्यकांच्या विकासानेच देशाचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:13 PM2018-11-11T22:13:41+5:302018-11-11T22:14:22+5:30
विविधतेत एकतेचे नावच हिंदूस्थान आहे. देशातील राज्य मुख्यत: भाषेच्या आधारावर वाटण्यात आले असून बोली भाषेसोबतच तेथील नागरिकांच्या जातीही बदलतात. या विविधतेला एकतेत बांधून देशाला पुढे आणण्याचे काम कॉँग्रेस पक्षाने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विविधतेत एकतेचे नावच हिंदूस्थान आहे. देशातील राज्य मुख्यत: भाषेच्या आधारावर वाटण्यात आले असून बोली भाषेसोबतच तेथील नागरिकांच्या जातीही बदलतात. या विविधतेला एकतेत बांधून देशाला पुढे आणण्याचे काम कॉँग्रेस पक्षाने केले आहे. त्यामुळे देशातील अल्पसंख्यकांच्या विकासानेच देशाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
जिल्हा कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला प्रदेश कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलचे सचिव अब्दूल शहजाद शेख उपस्थित होते. याप्रसंगी शेख यांनी, भाजप सरकारच्या मुस्लीम समुदायाचाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच आहे. मुस्लीम समुदायाला सोबत घेऊन चालण्याची भूमिका कॉंग्रेसची होती. त्यामुळे आता अल्पसंख्यकांना कॉँग्रेससोबत जोडावयाचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरी जावून अल्पसंख्यक समुदायाला जोडण्यासाठी पूर्ण ताकत लावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
सभेला कॉँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंग गुलाटी, नगर परिषद सभापती शकील मंसूरी, अल्पसंख्यक सेल जिल्हाध्यक्ष जहीर अहमद, अफजल शाह, संजय जैन, नफीस सिद्धीकी, जलील पठाण, सरफराज गोडील, अशोक चौधरी, खलील पठाण, कैजार हुसेन, भद्दू पठाण, इरफान शेख, शहजादा शेख, यासीन शेख, आस्ताफ सिद्धीकी, नसिम अहमद, कय्युम शेख, जावेद खान, इमरान शेख, नफसील शेख, सय्यद इकबालुद्दीन, साबीर पठाण, इत्तेफाक आलम, रियाज कच्छी, इकबाल पठाण, हाजी खुर्शीद अली यांच्यासह मोठ्या संख्येत मुस्लीम बांधव व काँग्रेस कमिटी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.