सोनाली देशपांडे : महिला सक्षमीकरण व हळदीकुंकू मेळावा तिरोडा : स्वच्छ घर, घराची देखभाल, मुलांचा सांभाळ, सासू-सासरे व पतीची देखभाल तसेच सर्व नातेवाईकांचा सन्मान संपूर्ण महिला भगिणी करतात. शिवाय आता त्या सामाजीक कार्यातही अग्रेसर आहेत. त्यामुळे महिलांच्या पुढाकारानेच समाजाचा विकास होत असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी केले. दवनीवाडा येथे महिला सक्षमीकरण व हळदीकुंकू मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती स्रेहा गौतम, नवनिर्वाचित न.प. सदस्या अॅड. हेमलता पतेह, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष व नगरसेविका भावना कदम, जि.प. सदस्य रजनी सोयाम, चित्रलेखा चौधरी, पं.स. सदस्य माया भगत, प्रियंका हेमणे, सविता अग्रवाल, सविता इसरका, सविता बेदरकर, मोहीनी निंबार्ते, नगरसेविका श्वेता मानकर, पं.स. सदस्य हेमलता पटले, सरपंच तिजा मस्करे, रानी सोनेवाने यांच्यासह सर्व महिला ग्रामविकास समिती पदाधिकारी, परिसरातील सरपंच महिला, उपसरपंच, महिला बचतगट कार्यकर्ते, गावातील सर्व महिला उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, शारदा माता, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, गाडगेबाबा यांच्या तेलचित्राला माल्यार्पण करुन पूजा अर्चना करण्यात आली. याप्रसंगी जि.प. हायस्कुलच्या विद्यार्थिनींनी लेझीम नृत्यद्वारे बेटी बचाव व स्वच्छतावर सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती स्रेहा गौतम, रजनी सोयाम, सविता बेदरकर, हेमलता पतेह, चित्ररेखा चौधरी, भावना कदम, छाया दसरे यांनीही उपस्थित महिलांना सर्व सामाजिक, आर्थिक, अत्याचार, महिलांचा पुढाकार, ५० टक्के आरक्षण, बेटी बचाव, भू्रण हत्या, सिकलसेल या सर्व विषयांवर सर्व पाहुण्यांचे महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गीता उके यांनी मानले. संचालन सरिता देवतारे यांनी केले. आभार गंगासागर मंडेले यांनी मानले. कार्यक्रमासाठी पं.स. सदस्य गुड्डू लिल्हारे, राजेश उरकुडे, निरज सोनवाने, मंडेले, महिला ग्राम विकास समिती अध्यक्ष जतपेले, संगीता लिल्हारे, राजकुमारी बघेले, गिरीजा मानकर, पुष्पा हेमलकर, प्रियंका मेश्राम यांनी सहकार्य केले.
महिलांच्या पुढाकारानेच समाजाचा विकास
By admin | Published: February 06, 2017 12:48 AM