साखरीटोला : अलीकडच्या काळात स्वदेशी खेळाकडे दुर्लक्ष होत असून विदेशी खेळांचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे स्वदेशी खेळांना महत्व देणे गरजेचे असून कबड्डी, खो-खो, यासारख्या स्वदेशी खेळातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकसीत होऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. जिल्हा परिषद शिक्षण विभाग, ग्रामपंचायत सातगाव तसेच जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजीत पाच दिवसीय स्वदेशी जिल्हा क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शिक्षण सभापती पी.जी.कटरे, समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, जिल्हा परिषद सदस्य लता दोनोडे, सरपंच संगीता सराम, जिल्हा परिषद सदस्य विठोबा लिल्हारे, रजनी गौतम, शेखर पटले, दुर्गा तिराले, जियालाल पंधरे, विजय टेकाम, उषा शहारे, सभापती हिरालाल फाफनवाडे, सभापती स्रेहा गौतम, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपसभापती राजेश भक्तवर्ती, अर्जुन नागपुरे, उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, कांता लांजेवार उपस्थित होते. यावेळी स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे यशवंत भगत, नरेंद्र डहाके, शामलाल कुंभलकर यांचा सत्कार करण्यात आला. या पाच दिवसीय महोत्सवात कबड्डी, खो-खो, नाटिका, दौड, रस्सी दौड, लांब उडी, प्रेक्षणीेय कवायत स्पर्धा घेण्यात आल्या. महोत्सवात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक स्तरातील सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. संचालन प्रा. सागर काटेखाये व संतोष उईके यांनी केले. आभार देशकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी सरपंच संगीता कुसराम, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, अरविंद गजभिये, प्रभाकर दोनोडे, डॉ. संजय देशमुख, संजय दोनोडे, संजय कुसराम, राजु काळे, संतोष बोहरे, लक्ष्मीनारायण लांजेवार, अनिल काळे, प्रकाश राऊत, काश्मिरसिंग बैस, रामदास हत्तीमारे तसेच ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकारी व गावकऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)विजेत्यांना केले पुरस्कृतया महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. यात प्रेक्षणीय कवायतमध्ये प्राथमिक स्तरावर प्रथम जामखारी (आमगाव) तर द्वितीय क्रमांक नवरगावकला (गोंदिया) ला देण्यात आला. तर माध्यमिक स्तरावरील प्रथम क्रमांक मोरवाही (गोंदिया) तर द्वितीय क्रमांक सातगाव शाळेला बहाल करण्यात आला. नाटिका या सांस्कृतीक प्रकारात डोंगरगाव (तिरोडा) व वडेगाव (देवरी) यांना प्रथम क्रमांक तर साखरीटोला व डोंगरगाव यांना द्वितीय क्रमांक देण्यात आला. क्रीडा प्राविण्यात गोंदिया शाळा प्रथम तर देवरी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. कबड्डी या खेळात मुलांमध्ये माध्यमिक स्तरावर अरततोंडी (अर्जुनी-मोर) प्रथम तर मुलींच्या गटातून पिंडकेपार (देवरी) यांना देण्यात आला. खो-खो मध्ये कुणबी गल्लाटोला (सालेकसा) यांना प्रथम क्रमांक देण्यात आला. प्राथमिक स्तरावरील मुले गटात कबड्डीमध्ये रामपूर (आमगाव) मुलींच्या गटातून कासा यांना प्रथम क्रमांक देण्यात आला. तसेच खो-खो मध्ये मुलींच्या गटात कासा (गोंदिया) ला प्रथम क्रमांक बहाल करण्यात आला. याशिवाय वैयक्तीक स्पर्धांचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.
खेळातून विद्यार्थ्यांचा विकास
By admin | Published: January 23, 2016 12:28 AM