लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नागझिरा कोका वन्यजीव अभयारण्य तसेच पर्यटनस्थळ व प्रकल्प आहेत. या स्थळांचा सर्वांगिन विकास केल्यास पर्यटन विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतंर्गत पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार असल्याचे खा.सुनील मेंढे यांनी सांगितले.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील नागझिरा कोका वन्यजीव अभयारण्य आणि नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान येथील पर्यटन विकासाला केंद्र सरकार सर्वोतोपरी सहकार्य करणार असून यासाठी राज्य सरकारतर्फे तयार करण्यात येणारा आराखडा केंद्रीय पर्यटन मंत्रालयाला सादर करण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे आश्वासन केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिल्याचे खा. सुनील मेंढे यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतंर्गत या अभयारण्याच्या पर्यटन विकास करण्यात येणार आहे. दरम्यान संबंधित वन क्षेत्रातील बफर झोनमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी रोजगार निर्मितीचा प्रश्न लक्षात घेऊन मेंढे यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. बफर झोनमधील लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून केंद्र सरकारद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. तसेच खासदारांनी सुचिवल्यानुसार पर्यावरण व वन मंत्रालय आणि राज्य सरकारने याबाबत काही विशेष योजना आणल्यास आपण त्या बाबतीत नक्कीच सकारात्मक विचार करु अशी ग्वाही केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी मेंढे यांना दिली. पर्यटन स्थळाच्या विकासासाठी राज्य सरकार आणि पर्यावरण व वन मंत्रालयाशी चर्चा करून विशेष योजना तयार करणार असल्याचे खा.मेंढे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.
स्वदेश दर्शन योजनेंतर्गत पर्यटनस्थळांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:13 PM
गोंदिया-भंडारा जिल्ह्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नागझिरा कोका वन्यजीव अभयारण्य तसेच पर्यटनस्थळ व प्रकल्प आहेत. या स्थळांचा सर्वांगिन विकास केल्यास पर्यटन विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतंर्गत पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार असल्याचे खा.सुनील मेंढे यांनी सांगितले.
ठळक मुद्देसुुनील मेंढे : लवकरच तयार होणार आराखडा