लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार अर्जुनी मोरगाव पंचायत समिती स्तरावर तालुका व्यवस्थापन व विकास समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष सभापती अरविंद शिवणकर आहेत. या समितीमुळे तालुक्यातील विविध विभागाच्या विकास कामांना गती मिळणार आहे.अर्जुनी मोरगाव तालुकास्तरावरील विविध योजनांच्या अंमलबजावणीत गतीमानता आणणे, प्रशासन पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी ग्रामस्थांची सनद लागू करण्यात आली होती. यात शासन निर्णयाद्वारे बदल करुन ग्रामस्थांची सनद सुधारित स्वरूपात तयार करण्यात आली असून त्या ऐवजी पारदर्शी पंचायतराज प्रशासन नव्या स्वरुपात करण्यात आली आहे.पंचायतराज संस्थेमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतमार्फत विविध विकास योजना राबविण्यात येतात. या तिन्ही स्तरावर योजनांची अंमलबजावणी करताना लोकनियुक्त प्रतिनिधी व अधिकारी, कर्मचारी यांचा समन्वय असणे आवश्यक आहे. त्यामुळे योजना अंमलबजावणीतील अडचणी दूर करणे, विकास कामांचा दर्जा उंचावणे आदीबाबत तालुका स्तरावर जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, तालुका स्तरावरील अधिकारी व सरपंच यांचा समावेश असलेली तालुका विकास समिती गठित करण्याचे शासन निर्देश आहेत. त्यानुसार अर्जुनी मोरगाव पंचायत समितीमध्ये तालुका व्यवस्थापन व विकास समिती गठित करण्यात आली आहे.पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर हे या समितीचे अध्यक्ष असून गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार हे निमंत्रक सचिव म्हणून राहणार आहेत. ही समिती एकूण ५२ सदस्यांची राहणार असून तालुक्यातील १४ गावांचे सरपंच हे सदस्य राहणार आहेत. तर तालुक्यातील प्रत्येक विभागाचे प्रशासकीय विभाग प्रमुख हे सुद्धा सदस्य म्हणून राहतील. तालुक्यातील सातही जि.प. सदस्य व १४ पंचायत समिती सदस्यांचा समितीत सदस्य म्हणून सहभाग राहणार आहे. या महत्वपूर्ण समितीची सभा दर तीन महिन्यांनी घेतली जाणार आहे.या समितीच्या सभेत जि.प. व राज्य शासन अधिनस्त प्रशासकीय विभाग प्रमुख आपापल्या विभागाच्या विकासकामांचा आढावा सादर करतील. त्यामुळे तालुक्यातील सर्वच विभागाच्या विकास कार्याला गती मिळणार आहे. तसेच प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय कायम राहून तालुक्याच्या सर्वांगिण विकासाला नक्कीच चालणा मिळेल व कुठेही कामे रेंगळणार नाही, असा विश्वास तालुका व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष पं.स. सभापती अरविंद शिवणकर यांनी व्यक्त केला.
विकास कार्यास चालना मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 9:08 PM
लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार अर्जुनी मोरगाव पंचायत समिती स्तरावर तालुका व्यवस्थापन व विकास समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष सभापती अरविंद शिवणकर आहेत. या समितीमुळे तालुक्यातील विविध विभागाच्या विकास कामांना गती मिळणार आहे.अर्जुनी मोरगाव तालुकास्तरावरील विविध योजनांच्या अंमलबजावणीत गतीमानता आणणे, प्रशासन पारदर्शक व ...
ठळक मुद्देपंचायत समिती : तालुका व्यवस्थापन व विकास समिती गठित