शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
शिवसेनेत आमदारकीच्या तिकीटासाठी २०-२० कोटींची मागणी; लक्ष्मण हाकेंचा शिंदेंवर गंभीर आरोप
3
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
4
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
5
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
6
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
7
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
8
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
9
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
10
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
11
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
12
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
13
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
14
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
15
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
16
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
17
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
18
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
19
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
20
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार

भक्तीमुळे वाढतो पुण्यसंचय

By admin | Published: February 07, 2017 1:00 AM

भक्ती केल्याने मनाचे सामर्थ्य वाढते. मन व्यापक होते. भक्ती मनाचा आयाम आहे. भक्तीमुळे पुण्यसंचय वाढते. सामर्थ्य वाढले तर आयुष्यातले प्रश्न सुटतात.

कानिफनाथ महाराज : प्रवचन, दर्शन व साधक दीक्षा कार्यक्रमअर्जुनी मोरगाव : भक्ती केल्याने मनाचे सामर्थ्य वाढते. मन व्यापक होते. भक्ती मनाचा आयाम आहे. भक्तीमुळे पुण्यसंचय वाढते. सामर्थ्य वाढले तर आयुष्यातले प्रश्न सुटतात. हरिनामामध्ये प्राबल्य आहे. प्राबल्यामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकतो. यासाठी भक्ती करा व जीवन सुखमय बनवा, असे प्रतिपादन जगतगुरु नरेंद्र महाराज यांचे वारसदार कानिफनाथ महाराज यांनी केले.ते येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित प्रवचन, दर्शन व साधक दीक्षा कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले, जो रंजल्यागांजल्यांची सेवा करतो, जिथे तुझा आणि माझा असा भेदभाव नसतो तिथेच ईश्वर आपले अस्तित्व निर्माण करतो. प्रत्येकाच्या जीवनात दु:ख येतात. मात्र या दु:खाला माणूसच कारणीभूत असतो. माणसाचे विचार, आचरण पवित्र असले पाहिजे. ईश्वर सांगतो आतातरी जागे व्हा. मुनष्य झोपी गेलेला असतो तेव्हा कान व डोळे उघडे असतात. परंतु अंतर्मनातला माणूस झोपलेला असतो. माणसाचं काम प्रेम देणं, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं आहे. माणूस निस्वार्थ भावनेने जगला पाहिजे, पण असे घडत नाही. याचाच अर्थ आपण अद्याप मनातून जागे झालेलो नाही. ज्याने जीवनाच्या केंद्रबिंदूला घट्ट मिठी मारली तो आमिष, वासना व स्वार्थाला बळी पडत नाही. आपण ज्याला माझं म्हणतो ते आपलं नाही. तरी सुद्धा माणूस आमिषाला बळी पडतो व नुकसान होते. माणसाने ज्या गोष्टीला माझं म्हटलं आहे तिथेच प्रश्न निर्माण होतात व दु:ख वाट्याला येते. माया जीवनात आनंद देते. पण तेवढेच दु:खही देते. ज्यावेळी माणसात भ्रम, अहंकार निर्माण होतो, तेव्हा मनुष्य बुडतो. मायेची माणसाला नशा येते. बुद्धीला भ्रम पडतो. यातून बाहेर पडण्यासाठी ईश्वराचं अधिष्ठान आपल्या मनात बिंबवणं गरजेचं आहे. मग ईश्वर कुठे आहे. कलियुगात ईश्वर मंदिरात नाही, तो संतामध्ये आहे. त्याला ओळखण्याची पात्रता माणसामध्ये निर्माण झाली पाहिजे. कलियुगात देवाने संतामध्येच देवत्व निर्माण केले आहे. स्वप्नातही कुणाचं वाईट चिंतू नका. वैऱ्याशीही चांगले वागा. चांगले कर्म व आचरण केल्याने जीवनमान उंचावता येते. भक्तीमुळे पुण्य वाढते. पुण्य वाढले की मागच्या काळातील दुष्कर्म संपुष्टात येतात. मनाचे सामर्थ्य वाढले की उद्भवलेल्या प्रसंगात काय निर्णय घ्यायचा, कर्म कसे करायचे हे आपोआप सुचते. यासाठी दररोज भक्ती केली पाहिजे. सद्गुरु म्हणजे भक्तीची बँक आहे. सद्गुरुवर विश्वास ठेवा, तो तुमच्या पाठीशी उभा राहील. जोवर तुमच्यात अहंकार आहे तोवर देवाचा अनुभव येणार नाही. माणसाच्या मनात प्रचंड ऊर्जा, ताकद आहे. मन रिकामं राहीलं तर सैरावैरा पळतं. यासाठी मनाला काबूत ठेवणं गरजेचं आहे. मनावर संयम नसला तर वाईट घडतं. मन विक्षिप्त झालं, संस्काराला सोडून वागायला लागलं तर जीवनात दु:ख, त्रास होतो. जीवनाची दुर्दशा होते. अपयश व नैराश्य येते. माणसाचं मन माणसाला राजा व भिकारीही बनवू शकतं. यशामुळे माणसाचा अहंकार वाढतो व अहंकारातून माणूस संपतो. त्यासाठी अहंकार बाळगू नका, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी माजी आ. रामरतन राऊत, नगराध्यक्षा पौर्णिमा शहारे, जि.प.च्या बांधकाम व अर्थ समिती सभापती रचना गहाणे, शिव शर्मा, उमाकांत ढेंगे, विजय कापगते, संज़य ठाकरे, दीपक गुप्ता, हर्षल मोदी, प्रकाश गहाणे, अशोक चांडक, गिरीष पालीवाल उपस्थित होते. संस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत २५ निराधार महिलांना शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमारे १० हजार दर्शनार्र्थींनी हजेरी लावली. (तालुका प्रतिनिधी)