गोंदिया : पावसाने दडी मारल्यामुळे शेतील पाण्याची गरज असून यासाठी शेतकऱ्यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांना निवेदन देऊन पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार, धापेवाडा प्रकल्पाचे पाणी पंपाद्वारे खळबंदा जलाशयात सोडण्यात आले आहे. लवकर हे पाणी शेतीसाठी सोडले जाणार असल्याचे आश्वासन जैन यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.
पावसाने दडी मारल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत आहे. त्यामुळे लवकरच शेतीकरिता पाणी न मिळाल्यास हातचे पीक जाणार व शेतकरी संकटात येणार. यामुळे शेतकऱ्यांनी माजी आमदार जैन यांना निवेदन देत शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. या गंभीर बाबीकडे लक्ष देत जैन यांनी लगेच धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कापसे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून धापेवाडा प्रकल्पाचे पाणी पंपाद्वारे खळबंदा जलाशयात सोडण्याचे निर्देश दिले. यावर लगेच संबंधित विभागाद्वारे प्रकल्पाचे पाणी खळबंदा जलाशयात सोडण्यात आले. तर लवकरच पाणी शेतीसाठी सोडले जाणार असल्याचे आश्वासन जैन यांनी शेतकऱ्यांना दिले.
झालुटोला, खळबंदा, दवनीवाडा, देऊटोला, बोदा गोंडमोहाळी, महालगाव, मुरदाळा, धापेवाडा, लोधीटोला, पिपरटोला, बिजाईटोला, वळद, खातीटोला, सहेसपूर, सेजगाव, सोनेगाव, नहारटोला, अत्री, परसवाडा, बोरा, डब्बेटोला, अर्जुनी, खैरलांजी, करटी, इंदोरा ही सर्व गावे लाभक्षेत्रात येत असल्याने त्यांना जलाशयाच्या पाण्याचा उपयोग होणार आहे. निवेदन देताना, नरहरप्रसाद मस्करे, नीरज उपवंशी, कृष्णकुमार ठकरेले, प्रकाश नागपुरे, रितेश जायस्वाल, दयाराम आगाशे, पवनकुमार बनोटे, विष्णुभाऊ नागपुरे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.