शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

ढिवर समाज व मत्स्य तलाव बचाव समितीचे धरणे

By admin | Published: May 17, 2017 12:17 AM

शासनाच्या धोरणांमुळे मत्स्य व्यवसाय अडचणीत येऊ लागला आहे. या धोरणामध्ये बदल करण्यात यावे,

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शासनाच्या धोरणांमुळे मत्स्य व्यवसाय अडचणीत येऊ लागला आहे. या धोरणामध्ये बदल करण्यात यावे, तसेच मत्स्य व्यवसायाला सहकार्य करण्यात यावे या मागणीला घेऊन सोमवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढिवर समाज व मत्स्य तलाव बचाव समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना देण्यात आले. जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या तलावांच्या लिलावावर आणलेली स्थगिती मागे घेण्यात यावी, तलावातील गाळ उपसा करून मासेमारीसाठी उपलब्ध करुन देण्यात यावे, तलावांवर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे, तलावांची पुर्नमोजणी करण्यात यावी, तलावांच्या निकासी गेटची दुरुस्ती करण्यात यावी, त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसायाला आवश्यक साहित्य पुरवठा योजनांतर्गत करण्यात यावा आदी मागण्यांना घेवून मत्स्य तलाव बचाव संघर्ष समिती व ढिवर समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व संजय केवट, परेश दुरुगवार, जयचंद नगरे, महेद्र वालदे, जयेंद्र बागडे, कोमेश कांबळे, उमराव मांढरे, चंद्रकला कुतराहे, यशवंत दिघोरे, देवीलाल धुमके यांनी केले. दरम्यान शासनाच्या दुटप्पी धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. आंदोलन मंडपाला राज्याचे सामाजीक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट देवून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या व त्यांचे निवेदनही स्वीकारले. यानंतर आंदोलनकर्त्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.