लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता तातडीने रॅपिड अँटीजन तपासणीच्या माध्यमातून कोरोना संशयितांचे त्वरित निदान होण्यास मदत होणार आहे. असे मत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयात या अनुषंगाने नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली. या वेळी त्या बोलत होत्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. नितीन कापसे, डॉ.प्रशांत तुरकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे उपस्थित होते. डॉ. बलकवडे म्हणाल्या, कोरोना संशयितांचे त्वरीत निदान करण्यासाठी जिल्ह्या रॅपिड तपासणी प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून गोंदिया शहरातील कुंभारेनगर येथे ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या संशियत रुग्णांच्या प्राथमिक तपासणीकरीता टेस्ट किट अत्यंत उपयोगी आहे.या चाचणीचा अहवाल केवळ तीस मिनिटात उपलब्ध होतो. त्यामुळे प्रशासनाला जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. रॅपिड अँटीजन तपासणीकरिता सारी, आय.एल.आय, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार त्याचप्रमाणे कायमस्वरुपी असणारे आजार, गर्भवती महिला, ६० वर्षावरील व्यक्ती, तसेच कोरोना संशयीतांची तपासणी रॅपिड अँटीजन किटच्या माध्यमातून करता येणार आहे. रॅपिड अँटीजन टेस्टमधून संशयित व्यक्ती हा कोरोना बाधित असल्याचे निदान झाल्यास त्याच व्यक्तीला कोविड केअर सेन्टर अथवा संस्थात्मक विलिगकरण कक्षात दाखल करुन उपचार करण्यात येईल. जर व्यक्तीच्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्या व्यक्तीला घरी जाता येईल. तरी कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी न घाबरता आपली कोरोना रॅपिड अँटीजन चाचणी करण्यास पुढे यावे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. शस्त्रक्रि या, आपातकालीन आरोग्य प्रकरणे व कंटेन्मेट झोनमधील नागरिकांना रॅपिड अँटीजन तपासणीकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे.या ठिकाणी तपासणीची सुुविधाजिल्ह्यातील फिवर क्लीनिक, केटीएस जिल्हा सामान्य रु ग्णालय गोंदिया, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रु ग्णालय या ठिकाणी तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोंदिया येथील कुंभारेनगर येथील कंटेन्मेंट झोनमध्ये रॅपिड अँटीजन तपासणी १४ जुलैपासून पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी १५ जुलैपर्यंत एकूण ७५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
अर्ध्या तासात प्राप्त होतो अहवालरॅपिड अँटीजन टेस्ट किटच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचे स्वॅब नमुने घेऊन केवळ १५ ते ३० मिनिटात अहवाल प्राप्त होतो. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास व्यक्ती कोरोना बाधित आहे असे गृहीत धरुन त्या व्यक्तीवर उपचार केले जातात. व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे असून अहवाल निगेटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीचे पुन्हा स्वॉब नमुने घेऊन चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात. साधारणत: स्वॅब नमुने प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर २४ ते ४८ तासात अहवाल प्राप्त होतो. यामुळे बराच वेळ जातो. परंतु रॅपिड अँटीजन तपासणीच्या माध्यमातून अवघ्या ३० मिनीटात अहवाल प्राप्त होत असल्यामुळे प्रशासनाला जिल्ह्यात कोरोना संक्र मण रोखण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यास मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील इतर सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये यापुढे रॅपिड अँटीजन टेस्टची सेवा सुरु केली जाणार आहे.