लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात साथरोगावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येतात. परंतु डिसेंट्री-डायरीया सारख्या आजारांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साथ पसरते. एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या १० महिन्यांच्या काळात गोंदिया जिल्ह्यातील आठ हजार ३५६ लोकांना डिसेंट्री-डायरियाची लागणी झाली होती अशी कबुली स्वत: आरोग्य विभाग देत आहे.या १० महिन्यांच्या काळात कॉलरा एकालाही झाल्याची नोंद नाही. ६१४ लोकांना गेस्ट्रोची लागण झाली होती. डिसेंन्ट्री चार हजार ३३ जणांना झाली होती. मात्र त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधार आली आहे. डायरीयाची लागण चार हजार ३२३ जणांना झाली होती. परंतु त्यांच्यावरही वेळीच उपचार झाल्याने कुणीही दगावला नाही. २ हजार २९१ लोकांना टायफाईड निघाला व त्यांच्यावरही उपचार करण्यात आला.दूषित पाण्यामुळे अनेक साथीच्या आजारांशी लोकांना सामोरे जावे लागते.यंदा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असल्यामुळे उन्हाळ्यात डिसेंट्री-डायरीया या सारख्या आजाराला आता सुरूवात झाली आहे. पाच वषर्षाखालील बालकांना रोटा व्हायरसमुळे डायरीया होतो त्यामुळे त्यांची काळजी पालकांनी घ्यावी.दूषित पाण्याचे २४३५ नमुनेएप्रिल ते जानेवारी या १० महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील १३ हजार ८३७ नमुने तपासणीसाठी प्रयागशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील दोन हजार ४३५ म्हणजेच १७.५९ टक्के नमुने दूषीत असल्याचे तपासणीत पुढे आले आहे. या आजारांवर मात करण्यासाठी दूषित पाणी पिणे टाळणे गरजेचे आहे.६५१३ बालके सामान्य श्रेणीत नाहीतजिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील ९९ हजार १७९ बालकांपैकी या १० महिन्यांत ९७ हजार ४०२ बालकांचे वजन करण्यात आले. यात ९० हजार ८८९ बालके सामान्य श्रेणीत असल्याचे पुढे आले. परंतु पाच हजार ३२२ बालके कमी वजनाची तर एक हजार १९१ बालके तिव्र कमी वजनाची आहेत. एकूण सॅमची बालके ९८ तर मॅमची बालके ५७२ आहेत.
जिल्ह्यातील ८३५६ जणांना डायरियाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 9:09 PM
जिल्ह्यात साथरोगावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येतात. परंतु डिसेंट्री-डायरीया सारख्या आजारांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साथ पसरते. एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या १० महिन्यांच्या काळात गोंदिया जिल्ह्यातील आठ हजार ३५६ लोकांना डिसेंट्री-डायरियाची लागणी झाली होती अशी कबुली स्वत: आरोग्य विभाग देत आहे.
ठळक मुद्दे१० महिन्यांतील स्थिती : २२९१ जणांना टायफाईडने ग्रासले