मुख्य मार्गावर वाहने : प्रशस्त इमारत असूनही सोय नाहीबोंडगावदेवी : दाभना मार्गावर प्रशस्त अशा इमारतीमध्ये असलेल्या अर्जुनी-मोरगाव येथील बँक आॅफ इंडिया शाखेत सध्या ग्राहकांना कमालीची गैरसोय होत आहे. राज्य मार्गावरील सिंगलटोली बायपास मार्गाच्या दर्शनी भागात बँकेची इमारत आहे. वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर बँकेची शाखा असल्याने गर्दीची परिसीमा गाठल्याचे चित्र दिसून येत आहे. बँकेच्या शाखेत ग्राहकांचे वाहन ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्राहकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागतो. दाभना रोडवर ज्या ठिकाणी बँकेची शाखा कार्यरत आहे ती इमारत प्रशस्त अशी व देखणी आहे. मात्र बँकेच्या इमारतीमध्ये वानतळाची पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने बँक ग्राहकांची गैरसोय होत आहे. सिंगलटोली बायपास रोडवरील एका प्रशस्त इमारतीमध्ये बँक आॅफ इंडिया शाखा काही वर्षापुर्वीच स्थानांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सध्या बँकेशी देवाण-घेवान करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. ग्राहकांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होताना दिसत आहे. मात्र प्रशस्त इमारतीमध्ये सुरु झालेल्या बँकेच्या इमारतीमध्ये वाहनतळाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. बँकेच्या इमारतीसमोर पार्किंगची व्यवस्था दर्शविणारा फलक कुठेही दिसून येत नाही. ग्राहकांना स्वत:चे वाहन कुठे ठेवावे, असा यक्षप्रश्न पडतो. ज्या ठिकाणी बँकेची शाखा सुरु आहे ते ठिकाणी रहदारीचा मुख्य मार्ग आहे. सतत वाहनांची वर्दळ असते. वर्दळीच्या ऐन मुख्य मार्गावर बँकेची इमारत असल्याने ग्राहकांना वाहन कुठे ठेवावे याची चिंता पडते. बँकेच्या वरिष्ठांनी वाहनतळाची पुरेशी व्यवस्था करुन ग्राहकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी ग्राहकांची मागणी आहे. (वार्ताहर)
वाहनतळाअभावी बँक ग्राहकांची गैरसोय
By admin | Published: April 19, 2015 12:54 AM