लोकमत न्यूज नेटवर्कमुरदोली : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या शिष्टमंडळाने नागपूर रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलीस पाटलांच्या मागण्यांविषयी चर्चा करून निवेदन दिले.शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी केले. याप्रसंगी गडचिरोली जिल्हाध्यक्ष शरद पाटील ब्राम्हणवाडे, सचिव मुरारी दहीकर, नागपूर जिल्हाध्यक्ष विजय धांडगे, सचिव यशवंत इखंडे आदी उपस्थित होते. पोलीस पाटील संघटनेचे २० फेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेत अधिवेशना दरम्यान भेट घेऊन पोलीस पाटलांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यानंतर अनेकदा भृंगराज परशुरामकर यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार पोलीस पाटलांना मानधनात भरीव वाढ देण्याचे मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्य केले.तसेच सेवानिवृत्ती योजना व आरोग्य योजनेसह अनेक मागण्या लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले.यात पोलीस पाटलांना आता कोणतीच अडचण राहीली नाही. तसेच गडचिरोली येथे पेसा कायद्याचा फटका पोलीस पाटलांना बसणार नाही. त्याकरिता कायदेशीर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे येत्या काही दिवसांत पोलीस पाटलांच्या मागण्या पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल. या वेळी गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप मेश्राम, उपाध्यक्ष रमेश टेंभरे, सचिव राजेश बन्सोड, कोषाध्यक्ष श्रीराम झिंगरे, मार्गदर्शक सोमाजी शेंडे, महिला जिल्हाध्यक्ष नंदा ठाकरे, उपाध्यक्ष अनिता लंजे, प्रकाश कठाणे, पोमेश कटरे, टिकाराम कापगते, लोकचंद भांडारकर, गजानन जांभुळकर, मंदार बनमाली, चंद्रहास भानारकर, आनंदराव शिवणकर, प्रेमलाल टेंभरे, वनिता वाघमारे, सुषमा कटरे, शकुंतला पातोडे, खेमेश्वरी बोळणे, हेमराज सोनवाने, सोमराज बघेले, माधोराव शिवणकर, परिमल ठाकूर, वासनिक आदी उपस्थित होते.
पोलीस पाटील संघटनेची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:22 AM