देवरी : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संघ गोंदिया जिल्हा या संघाची जिल्हास्तरीय सभा देवरी येथील मॉ धुकेश्वरी मंदिराच्या सभागृहात बुधवारी (दि.२५) संघाचे अध्यक्ष शंकर मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेत आदिवासी सहकारी संस्थेच्या सर्व समस्या शासनस्तरावर कशाप्रकारे सोडविण्यात येतील याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी सहकारी संस्थेचे वर्ष २०१९-२० व २०२०-२१ या वर्षाचे शासनाकडे असलेली कमिशन रक्कम व वर्ष २०१८-१९, २०१०-२० आणि २०२०-२१ चे शेतकऱ्यांच्या बारदान्याची रक्कम तसेच गोदाम भाडे, घरभाडे व खुल्या जागेचे २०१९-२०, २०२०-२१ या वर्षातील खरीप व रब्बी हंगामाकरिता संस्थेची लागलेली मजुरीची रक्कम त्वरित मिळण्याबाबत, आदिवासी विकास महामंडळाच्या नफ्यातून सर्व धान खरेदी करणाऱ्या आदिवासी सहकारी संस्थेला लाभांश मिळण्याबाबत आणि संस्थेचे करारनामा दुरुस्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभेत सहकारी संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर मडावी यांच्यासह संघाचे उपाध्यक्ष मानिक बापू आचले, सचिव हरिश कोहळे, सदस्य सुकचंद राऊत, तुलाराम मारगाये, रघुनाथ कुरसुंगे, हिरालाल उईके, रामेश्वर नरेटी, लक्ष्मण लटये, प्रेमलाल नागपुरे, देवदास कोरे, शंकर लंजे, विनोद दोनोडे व सदस्य उपस्थित होते.