लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील हलबीटोला मार्गावर रेल्वे विभागाने नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी बोगदा तयार केला. मात्र पावसाळ्यात या बोगद्याखाली दहा ते बारा फुट पाणी साचून राहत असल्याने गावकऱ्यांनी रेल्वे विभागाच्या विरोधात संताप व्यक्त करीत रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. याचीच दखल घेत बुधवारी (दि.५)गोंदिया रेल्वे विभागाचे योगेशकुमार जायस्वाल यांनी हलबीटोला भुयारी बोगद्याला भेट देवून पाहणी केली.तसेच साचलेल्या पाण्याची विल्हेवाट व पॉवर हाऊस जवळून रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले.हलबीटोला मार्गावरील रेल्वे भुयारी बोगद्यात साचलेल्या पाण्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी गावकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.या मार्गावर पाणी साचून राहत असल्याने गावकऱ्यांची अडचण होत होती. या समस्येकडे नगर पंचायत गोरेगाव व काही सामाजिक कार्यकर्त्यानी रेल्वे विभागाशी संपर्क साधून गावकऱ्यांची समस्या मार्गी लावण्याची मागणी केली होती.याचीच दखल जायस्वाल यांनी हलबीटोला रेल्वे भुयारी बोगद्याची पाहणी करुन केली. नव्याने नालीचे बांधकाम तसेच पॉवर हाऊस जवळ रस्ता बांधकाम सुरु करण्याचे आश्वासन दिले.रेल्वे व्यवस्थापकांना निवेदनहलबीटोला रेल्वे भुयारी बोगद्यातील पाण्याची विल्हेवाट व पॉवर हाऊस जवळून रस्ता बांधकाम करण्यात यावे. यामुळे शालेय विद्यार्थी, गावकरी शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी त्रास थांबविता कमी होईल. त्यामुळे याकडे रेल्वे विभागाने लक्ष देण्याची मागणी केली. शिष्टमंडळात माजी आ.दिलीप बन्सोड, माजी पं.स.सदस्य डुमेश चौरागडे,प्रदीप जैन, महेंद्र चौधरी, राहुल कटरे, नगरसेवक रविंद्र चन्ने, नगरसेवक शोभा लटये, नगरसेवक मलेशाम येरोला, अनुराग सरोजकर, प्रदीप शहारे, बाबा चौधरी, अनिल राऊत, फिरोज कुरैशी, परमानंद चुलपार, वेंकट पटले, अफरोज कुरैशी, नंदू पटले, विनोद कुरपाल, रंजीत रंगारी उपस्थित होते.
भुयारी बोगद्यातील पाण्याची होणार विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 12:57 AM
लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील हलबीटोला मार्गावर रेल्वे विभागाने नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी बोगदा तयार केला. मात्र पावसाळ्यात या बोगद्याखाली दहा ते बारा फुट पाणी साचून राहत असल्याने गावकऱ्यांनी रेल्वे विभागाच्या विरोधात संताप व्यक्त करीत रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. याचीच दखल घेत बुधवारी (दि.५)गोंदिया रेल्वे विभागाचे योगेशकुमार जायस्वाल ...
ठळक मुद्देरेल्वे मंडळ व्यवस्थापकांना निवेदन : इशाऱ्याची घेतली दखल