शिवार अभियान: खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांना झुकते मापलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी पं.दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या शिवार संपर्क अभियानात संपर्क अभियानाच्यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध प्रकारच्या समस्यांचा पाढा आमदारासमोर वाचला. ज्वलंत समस्याचे निराकरण त्वरीत करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आ. पुराम म्हणाले. पाच दिवसीय शिवार संपर्क अभियान अंतर्गत आ. पुराम यांनी सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द, झालीया, कारूटोला आणि पिपरीया या चारही जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी वर्गाशी थेट संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या घरीच जेवण केले. त्यांच्याशी संवाद साधीत आपला वेळ देत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेण्याच्या प्रयत्न केला. या दरम्यान शेतकऱ्यांनी सुध्दा मनमोकळेपणाने आमदारांशी संवाद साधत आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्याच्या धानाला शासकीय खरेदी केंद्रावर विक्री केल्यास शेतकऱ्यांची कशा कशा प्रकारे लूट होते. शेतकऱ्यांच्या धानापेक्षा व्यापाऱ्यांच्या धानाला कसे जास्त महत्व दिले जाते. चुकाऱ्यासाठी कशा चकरा माराव्या लागतात. खताचे वाढते भाव, खत खरेदी मध्ये लूट शासकीय अनुदानाचा लाभ न मिळावे शेतीला वीज जोडणी लवकर न मिळते तसेच गावातील रस्ते, पाणी इत्यादी अनेक समस्या सुध्दा गावकऱ्यांनी मांडल्या. यापैकी काही समस्यांना त्वरीत सोडवण्याचा प्रयत्न आमदाराने केला. काही संबंध आपल्या डायरीमध्ये नोंद करुन संबंधीत विभागाशी संपर्क करून दूर करण्याचा आश्वासन. आ. पुराम यांच्या शिवार संपर्क अभियानात तालुका भाजप अध्यक्ष परसराम फुंडे, महामंत्री मनोज बोपचे, राजेंद्र बडोले, आदित्य शर्मा, माजी सभापती बाबा लिल्हारे, महिला तालुका अध्यक्ष कल्याणी कटरे, मनोज दमाहे, संजु कटरे, यादन नागपुरे, रतन टेंभरे, बद्री प्रसाद दसरिया, बबलू मच्छिरके, प्रतिभा परिहार, बाबा परिहार, गादीप्रसाद भगत, हेमराज सुलाखे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आपआपल्या परिसरातील शिवार संवादात सहभागी झाले होते.
सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मांडल्या आमदारांकडे व्यथा
By admin | Published: June 12, 2017 1:28 AM