भात पिकाचे साकोली-९, डीआरआर ४६, एमटीयू ११५३ या वाणांच्या प्रति २५ किलो बॅगेची किंमत रु. ११२५ असून, अनुदानावर रु. ६२५ ला उपलब्ध आहे. को-५१ या वाणाचे प्रति २५ किलो बॅगची किंमत रु. १०० असून, अनुदानावर रु. ५०० ला उपलब्ध आहे. पीकेव्ही तिलक १० किलो बॅगची किंमत रु. ५२० असून, अनुदानावर ३२० ला उपलब्ध आहे. पीकेव्ही-किसान १० किलो बॅगची किंमत ४७० असून, अनुदानावर २७० रुपये उपलब्ध आहे. आयआर ६४, सुवर्णा व कर्जत ३ बियाणांचे २५ किलो बॅगची किमत १०२५ रुपये असून, अनुदानावर रु. ७७५ ला उपलब्ध आहे. पीकेव्ही -एचएमटी २५ किलो बॅगची किंमत रु. ११५० असून, अनुदानावर रु. ९०० ला उपलब्ध आहे. एमटीयू १०१०, एमटीयू १००१ बियाणांच्या २५ किलो बॅगची किंमत ९५० असून, अनुदानावर रु. ७०० उपलब्ध आहे. तूर पिकामध्ये पीकेव्ही- तारा, या वाणाच्या २ किलो बॅगची किमत रु. २६० असून, अनुदानावर रु. १६० ला उपलब्ध आहे.
भात व तूर पिकांचे प्रमाणित बियाणे वितरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:36 AM