लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २४ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशी आणि रोजगारासाठी आलेले इतर राज्यातील मजूर गोंदिया जिल्ह्यात अडकले होते. केंद्र शासनाने या मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्याचे आदेश दिले. याच अंतर्गत मंगळवारी (दि.५) जिल्हा प्रशासनाने मध्यप्रदेशातील बालाघाट येथील ८७ मजुरांना बसने त्यांच्या गावी पाठविले.देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने विविध राज्यातील कामगारांना तिथे आहात तिथेच थांबण्यास सांगण्यात आले होते. या काळात शेजारील बालाघाट जिल्ह्यातील ८७ मजूर हे गोंदिया जिल्ह्यातच अडकले होते. त्या सर्वांना तिसºया टप्यातील लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संबधित राज्यात पोचविण्यास ुसुरूवात केली आहे.यातंर्गत मंगळवारी सकाळी येथील नेहरु चौकातून राज्य परिवहन महामंडळाच्या २ बसच्या माध्यमातून ८७ मजुरांना बालाघाट जिल्ह्यात ४ फेरीमध्ये सोडण्यात आले.या वेळी कामगारांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगत त्यांची बसण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी संगिता सवरंगपते, गोंदिया न.प.मुख्याधिकारी चदंन पाटील, महसूल कर्मचारी व न.प.कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने केले बालाघाटच्या मजुरांना रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 5:00 AM
देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने विविध राज्यातील कामगारांना तिथे आहात तिथेच थांबण्यास सांगण्यात आले होते. या काळात शेजारील बालाघाट जिल्ह्यातील ८७ मजूर हे गोंदिया जिल्ह्यातच अडकले होते. त्या सर्वांना तिसºया टप्यातील लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संबधित राज्यात पोचविण्यास ुसुरूवात केली आहे.
ठळक मुद्दे८७ मजुरांची दोन बसने पाठविले : लॉकडाऊनमुळे होते अडकले, चार बस फेऱ्यांनी व्यवस्था