लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दरवर्षी कृषी विभागाच्यावतीने राज्यातील शेतकरी व शेती संस्थांना विविध कृषी पुरस्कारांंनी सन्मानित केले जाते. त्यानुसार, सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात मागविलेल्या प्रस्तावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मात्र विविध पुरस्कारांच्या निवड यादीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकही शेतकरी व शेती संस्थेचा समावेश नाही. यामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था व शेतकरी नावापुरतेच आहेत काय? असा सवाल कृषी तज्ज्ञांकडून उपस्थित होऊ लागला आहे.कृषी क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाने प्रगती व्हावी, त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रात कार्यरत शेतकरी व शेतीविषयक संस्थांना प्रोत्साहन मिळावे हे प्रमुख उद्देश बाळगून राज्य शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्यावतीने विविध कृषी पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, कृषी भूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, पद्मश्री डॉ. विखे पाटील कृषी पुरस्कार, कृषी सेवा रत्न पुरस्कार व राज्यस्तरीय पीक स्पर्धा आदी कृषी पुरस्कारांचा समावेश आहे. यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयामार्फत शेतकरी व कृषी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येते. त्यानंतर निकषांतर्गत गुणानुक्रमानुरुप पुरस्कारांसाठी निवड केली जात असते.कृषी विभागाच्या माध्यमातून पुरस्कारासाठी सादर करण्यात आलेल्या पुरस्काराची निवड करुन राज्य शासनाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पुरस्काराने शेतकरी किंबहूना शेती संस्थांना सन्मानित केले जाते.सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये मागविण्यात आलेल्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने (दि.२) शासन निर्णय निर्गमित करुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या शेतकरी व संस्थांची नावे जाहीर करण्यात आली.मात्र निवड यादीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकही शेतकरी व शेतीसंस्थांचा समावेश नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात प्रगतीशिल शेतकरी व कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था आहे की नाही? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. तर दुसरीकडे कृषी विभाग पुरस्कारासाठी शेतकऱ्यांना किंबहूना शेती संस्थांना प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात प्रेरीत करण्यात उदासीन आहे काय? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.
राज्यस्तरीय कृषी पुरस्काराच्या निवड यादीतून जिल्हा बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 9:37 PM
दरवर्षी कृषी विभागाच्यावतीने राज्यातील शेतकरी व शेती संस्थांना विविध कृषी पुरस्कारांंनी सन्मानित केले जाते. त्यानुसार, सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात मागविलेल्या प्रस्तावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मात्र विविध पुरस्कारांच्या निवड यादीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकही शेतकरी व शेती संस्थेचा समावेश नाही.
ठळक मुद्देशेतकरी व संस्थांचे नावच नाही : सन २०१५-१६ मधील प्रस्ताव