शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

जिल्ह्यात कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:46 PM

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (दि.१७) सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (दि.१७) सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित झाले होते. पावसाची कोसळधार कायम असल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. या पुराचा फटका बसल्याने अर्जुनी मोरगाव व आमगाव तालुक्यातील बनगाव येथील एकूण ४४ कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले. मुसळधार पावसामुळे ४९० घरे व गोठे पडून नुकसान झाले. मागील चौवीस तासात जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून पावसाची स्थिती पाहुन पुजारीटोला धरणाचे ८ तर धापेवाडा धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले होते. पावसामुळे जिल्ह्यातील २० पेक्षा अधिक मार्ग बंद झाले होते त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.रविवारी (दि.१५) रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले भरुन वाहत आहेत. तर नदी आणि नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने काही गावांचा संर्पक तालुका आणि जिल्ह्याशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तुटला होता. पुलावरील पाणी ओसरल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती आहे. सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद आमगाव तालुक्यात १९१.८५ मिमी झाली. तर त्या पाठोपाठ सालेकसा तालुक्यात १७३.६२, गोरेगाव १२८.३३ मिमी व अर्जुनी मोरगाव तालुक्यात ९५.२० मि.मी.पावसाची नोंद झाली. एकूण ३३ महसूल मंडळापैकी २१ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील तीन चार वर्षांत प्रथमच ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे बोलल्या जाते. दरम्यान मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी दोन तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी केलेली रोवणी वाहून गेली.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील शेती अवजारे आणि पाईप वाहून गेल्याने आर्थिक फटका बसला. पावसामुळे घरे आणि गोठ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.रस्त्यावर वाहनांच्या रांगाजिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पांगोली नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने गोरेगाव-सोनी-ठाणा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर आमगाव-देवरी मार्गावरील नाल्याला पूर आल्याने आमगाव-देवरी, सालेकसा-देवरी, आमगाव-कामठा, आमगाव-वडेगाव, बिजेपार-साखरीटोला, बिजेपार- अंजोरा, बोरकन्हार, बिजेपार-सालेकसा-गांधीटोला, सालेकसा-राजनांदगाव मार्ग बंद होता. कमरगाव नदीवरील पुलावर पाणी असल्याने मुंडीपार-तेढा या गावाचा संर्पक तुटला होता. आमगाव-शिवणी, आमगाव-चिरचाळबांध, आमगाव-तिगाव या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.सुदैवाने अनर्थ टळलामागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. आमगाव-देवरी मार्गावरील नाल्यावरुन पाणी वाहत असताना निमगाव येथील एका ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर पुलावरुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ट्रॅक्टर नाल्याच्या काठावर अडकले. दरम्यान उपस्थित नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान साधल्याने मोठा अनर्थ टळला. दोन ट्रक्टरच्या मदतीने नाल्यावर अडकलेले ट्रक्टर बाहेर काढण्यात आले. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.शहरातील वस्त्यांमध्ये साचले पाणीगोंदिया नगर परिषदेने शहरातील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफ सफाई न केल्याने मुसळधार पावसामुळे नाल्या चोख होवून सुर्याटोला, शास्त्रीवार्ड परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. नागरिकांची ओरड वाढल्यानंतर नगर परिषदेने उपाय योजना सुरू केल्याची माहिती आहे.पन्नासावर गावांचा संपर्क तुटलामंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत होते. तर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुजारीटोला धरणाचे ८ तर धापेवाडा प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले. यामुळे नदी आणि नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुलावरुन पाणी वाहत होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५० वर गावांचा जिल्हा आणि तालुक्याशी संपर्क तुटला होता.रस्त्यावरच अंत्यसंस्कारगोंदिया येथील पांगोली नदी परिसरात स्मशानभूमी आहे. मात्र पांगोली नदीला पूर आल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद होता. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानघाटावर जाता आले नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरच अंत्यसंस्काराचा विधी आटोपावा लागला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर