गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) जिल्हा कार्यकारिणीची विस्तारीत सभा सौंदड येथील व्यायाम मंदिरात जिल्हाध्यक्ष यादोराव टेंभरे यांच्या अध्यक्षतेत व राज्य महासंघाचे सचिव मिलिंद गणवीर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार पडली. सदर सभेत कर्मचाऱ्यांच्या स्थानिक विविध प्रश्नांवर चर्चा होऊन मागण्यांबाबद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच २८ जानेवारी रोजी डव्वा (पळसगाव) येथे कर्मचाऱ्यांचा जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरले. या मेळाव्याचे उद्घाटन सरपंच शारदा किरसान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मेळाव्याला महासचिव नामदेवराव चव्हाण, कार्याध्यक्ष तुकाराम भस्मे, उपाध्यक्ष शिवकुमार गणवीर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश पटले, ग्रामविकास अधिकारी अरविंद नागदेवे, जिल्हाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र पाटील, शेतमजूर युनियनचे शेखर कनोजिया, शापोआ कर्मचारी युनियनच्या करुणा गणवीर, आशा कर्मचारी युनियन शालू कुथे, अंगणवाडी, बालवाडी युनियनच्या आम्रकला डोंगरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन मेळाव्याचे प्रमुख संयोजक व महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष कय्युलम शेख, मुन्नालाल ठाकरे, टेकचंद चौधरी, राजेंद्र हटेले, सुनील गणवीर, रविंद्र फरदे, देवेंद्र शेंडे, उत्तम डोंगरे, उमेश राऊत, श्रीकिसन उके, विष्णु हत्तीमारे, खुशाल बनकर, निलकंठ फुल्लुके, रविंद्र बोपचे, मुकेश कापगते, संदीप मडावी, कन्हैयालाल कोरे, छत्रुघ्न लांजेवार, रमेश प्रधान, जीवनलाल भोयर, सोहनलाल बिसेन, गणु कृष्णा, डुलेश गोटेफोडे, खेमराज कापगते, रोशन हटकरश देवानंद मेश्राम आंदीनी केले आहे.
डव्वा येथे आयटकचा जिल्हा मेळावा २८ रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2017 12:36 AM