गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके असून, प्रत्येक तालुक्याला दोन व्हॅन दिल्या जाणार आहेत. ग्रामीण भागात लसीकरणासंदर्भात तेवढी जनजागृती नाही. वृद्ध, दिव्यांग हे लसीकरणासाठी केंद्रांवर जाऊन प्रतीक्षा करू शकत नाही. त्यांना घरीच त्वरित लस देण्यासाठी शासनाने आता लस देणारी व्हॅन गावागावात पाठविण्यासाठी जिल्ह्याला लसीकरणासाठी १६ मोबाइल व्हॅन दिल्या आहेत. प्रत्येक तालुक्याला दोन व्हॅन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या व्हॅनमध्ये कोविडशिल्ड, कोव्हॅक्सिनचा साठा राहणार आहे. या व्हॅनमध्ये लसीकरण करणाऱ्या परिचारिका, ब्रदर्स राहणार आहेत. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांच्याशी संपर्क साधला असता यासंदर्भात आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र मिळाले. परंतु त्या व्हॅन कुणी चालवायच्या, त्यात किती मनुष्यबळ असेल यासंदर्भात मार्गदर्शन मागवून लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याचे सांगितले.
लसीकरणासाठी जिल्ह्याला मिळाल्या १६ व्हॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:33 AM