शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

जिल्ह्यात मलेरियाचे पाच वर्षात २६ बळी

By admin | Published: June 08, 2017 2:04 AM

हिवतापामुळे मृत्यू होऊ नये यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहे. मागील पाच वर्षात

 ३२९ गावात डासनाशक फवारणी : मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाचा खटाटोप लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : हिवतापामुळे मृत्यू होऊ नये यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहे. मागील पाच वर्षात मलेरियाने २६ जणांचा बळी गेला असला तरी यंदा एकाही व्यक्तीचा मृत्यू नाही. तसेच दरवर्षीच्या तुलनेत यंदा फक्त मलेरियाचे ९८ रूग्ण आढळले आहेत. मलेरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील ३२९ आदिवासी व मलेरियाचा उद्रेक राहाणऱ्या गावात डासनाशक फवारणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलदृट्या संवेदनशील आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मलेरियाचे रूग्ण आढळतात. परंतु सालेकसा व देवरी या दोन तालुक्यात मलेरियाच्या रूग्णांची संख्या सर्वाधीक आहे. सन २०१२ मध्ये ४ लाख ४० हजार ७५५ रूग्णांची तपसणी केली. त्यात ७५४ रूग्ण आढळले. त्यातील ७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१३ मध्ये ४ लाख ४० हजार ८३६ रूग्णांची तपसणी केली. त्यात ५९४ रूग्ण आढळले. त्यातील ४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१४ मध्ये ४ लाख ९९ हजार ४८७ रूग्णांची तपसणी केली. त्यात १४६५ रूग्ण आढळले. त्यातील ९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१५ मध्ये ४ लाख ६७ हजार ८० रूग्णांची तपसणी केली. त्यात १४१५ रूग्ण आढळले. त्यातील ५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१६ मध्ये ४ लाख ९५ हजार २८६ रूग्णांची तपसणी केली. त्यात ९२० रूग्ण आढळले. त्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. सन २०१५ च्या मे पर्यंत १ लाख ४७ हजार ३८९ रूग्णांची तपसणी केली. त्यात ९८ रूग्ण आढळले. त्यासर्वांना वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. यावेळी जिल्हा हिवाताप अधिकारी डॉ.डी.एस. टेंभूर्णे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी चांदेकर व इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील ३६ गावात १२ हजार मच्छरदान्या वाटप करण्यात आल्या आहेत. ६ हजार ४२३ मच्छरदाण्या आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना यंदा वाटप करण्यात आल्या आहेत.१३०० किलो डासनाशक पावडर फवारणी करण्यासाठी उपलब्ध आहे. मलेरियावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी क्लोरोक्वीनच्या गोळ्या सर्व आशा स्वयंसेविकांकडे तसेच प्रत्येक गावातील जेष्ट नागरिकांकडे देण्यात आल्या आहेत. हिवताप नियंत्रणासाठी यांचे सहकार्य आरोग्य विभाग हिवताप नियंत्रणासाठी पोलीस विभाग, वनविभाग, नगर परिषद, जिल्हा माहिती विभाग, मत्स्य विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण, पंपायत विभाग, आदिवासी विकास प्रकल्प, स्वयंसेवि संस्था यांचीही मदत घेणार आहेत. ५३४ गप्पी मासे केंद्र डास नियंत्रणासाठी डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी आरोग्य शिक्षण देण्यासाठी अतिसंवेदनशील भागात गटसभा घेण्यात येत आहेत. डास नियंत्रण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपक्रेंद्रातंर्गत २६२ गप्पी मासे केंद्र व शहरात २७२ गप्पीमासे केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नियमीत गप्पीमासे सोडण्याचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत असल्याची माहिती देण्यात आली.