संतोष बुकावन ।आॅनलाईन लोकमतअर्जुनी-मोरगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालयाशी अर्जुनी-मोरगाव तालुकास्थळाची नाळ जुडलेली नव्हती. ११ नोव्हेंबर रोजी लोकमतने या प्रश्नाला वाचा फोडली.पालकमंत्र्यांनी १५ नोव्हेंबर रोजी गोंदिया आगाराला पत्र दिले व गोंदिया आगारातून अर्जुनी मोरगावसाठी १ डिसेंबरपासून तीन बस फेºया सुरु करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर भंडारा विभाग नियंत्रकांनी १७ नोव्हेंबर रोजी बस फेºया सुरू करण्याचे आदेश काढले. यामुळे अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील जनतेची सुविधा होणार आहे.भंडारा जिल्ह्याचे विभाजन १ मे १९९९ रोजी होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. अर्जुनी मोरगाव हा आदिवासी, नक्षलग्रस्त तालुका गोंदिया जिल्ह्यात समाविष्ट झाला. हे जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचे तालुका मुख्यालय आहे. येथून भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्हा मुख्यालयाचे अंतर ४० कि.मी. आहे. येथून भंडारा जिल्हा व त्या जिल्ह्यातील काही तालुक्यांशी थेट जोडणाºया अनेक बसेस आहेत. मात्र गोंदिया जिल्हा मुख्यालयाशी जोडणारी एकही बसफेरी उपलब्ध नाही हे तालुकावासीयांचे दुदैव आहे. महाराष्टÑातील हा एकमेव तालुका असल्याच्या चर्चा आहेत.यासंदर्भात लोकमतने नागरिकांची फरफट व लोकप्रतिनिधी गप्प असल्याचे वृत्त जिल्हा मुख्यालयी नाळ न जुडलेला अर्जुनी मोरगाव तालुका या शिर्षकाखाली ११ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची व तालुकावासीयांनी केलेला तक्रारीची पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दखल घेतली.संबंधित विभागाला पत्र दिले. अखेर १ डिसेंबरपासून गोंदिया-अर्जुनी मोरगाव मार्गावर प्रायोगिक तत्वावर तीन बसफेºया सुरु करण्याचे आदेश भंडाराच्या विभाग नियंत्रकांनी १७ नोव्हेंबर रोजी काढले.यापूर्वी प्रवाशांच्या मागणीनुसार अर्जुनी मोरगाव ते गोंदिया या दरम्यान परिवहन महामंडळातर्फे बससुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. मात्र अत्यल्प भारमान मिळाल्यामुळे महामंडळाचा या फेरीला आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे काही काळ सुरु ठेवल्यानंतर बस फेºया बंद कराव्या लागल्या.अर्जुनी मोरगाव येथून गोंदियाकडे जाण्यासाठी सकाळी ९.४५, दुपारी १.३०, सायं.६ व रात्री १० वाजता रेल्वे सुविधा आहे. तर गोंदियावरुन अर्जुनी मोरगावसाठी सकाळी ७, सकाळी १०.३०, सायं.५.१५ व रात्री ६.१० वाजता रेल्वे सुविधा आहे. गोंदिया ते अर्जुनी मोरगावचे रेल्वे भाडे २० तर बसचे ८८ रुपये असल्याने प्रवाशी प्रतिसाद देत नसल्याचे एस.टी. महामंडळाचे म्हणणे आहे.चुकीच्या वेळापत्रकाचा फटकाचुकीचे वेळापत्रक नियोजनामुळे एस.टी. महामंडळाला भारमान मिळत नाही. यासाठी एस.टी. महामंडळाचे अधिकारीच जवाबदार आहेत. उलट भारमान मिळत नाही म्हणून प्रवाशांची कोंडी करतात. व लोकप्रतिनिधी मुकदर्शकाची भूमिका बजावतात. वर्तमानपत्रातून बातमी प्रकाशित झाली तेव्हाच महामंडळाच्या अधिकाºयांना पत्र देतात. यावेळी सुद्धा एस.टी. महामंडळाचे अधिकारी प्रवाशांची दिशाभूल करीत आहेत. भारमान न मिळाल्यामुळे परत बसफेºया बंद होणाच हेच निश्चित आहे.अशी उपाय योजना करायापेक्षा महामंडळाने तीन बसफेºयांऐवजी गोंदिया-कुरखेडा ही एकच बसफेरी उपलब्ध करुन दिली तर सोईचे होऊ शकते. गोंदिया येथून दुपारी ३ वाजता बसफेरी सुरू करावी, यादरम्यान रेल्वे सुविधा नाही. कुरखेडा येथे बस मुक्कामी ठेवून कुरखेडावरुन सकाळी ६ वाजता वडसा-अर्जुनी मोरगाव-कोहमारा मार्गे काढल्यास निश्चितच प्रवाशी मिळतील. सकाळी गोंदिया येथे व्यापारी, विद्यार्थी व कर्मचाºयांना जाण्यासाठी कुठलीही सुविधा नसल्याने ही फेरी उत्तम भारमानासह सुरु राहू शकते. यादृष्टीने तीन बसफेºयांऐवजी यापद्धतीने केवळ एकच बसफेरी सुरळीत व नियमित सुरु ठेवावी अशी मागणी आहे.अभ्यास न करताच घेतला होता निर्णयमुळात या मार्गाचा महामंडळाने सखोल अभ्यासच केला नाही. रेल्वेच्या पाच फेºया उपलब्ध असल्याने भारमान मिळत नसल्याचा सखोल अभ्यासाअंती एस.टी. महामंडळाने निष्कर्ष काढला आहे. मात्र ते केवळ उंटावरुनच शेळ्या हाकण्याचे काम करीत आहेत. त्यांचे बस फेरीचे शेड्यूल रेल्वे वेळापत्रकाच्या आसपास असल्याने त्यांना भारमान मिळत नसल्याची बाब अगदी खरी आहे. एस.टी. महामंडळाला जर या मार्गावर भारमान मिळत नसेल तर अर्जुनी मोर ते नवेगावबांध, नवेगावबांध ते कोहमारा व कोहमारा ते गोंदिया अशी अवैध प्रवाशी वाहतूक कशी सुरु आहे. यात महामंडळाचे हित तर नाही ना? अशी प्रवाशात शंका व्यक्त केली जात आहे.या मार्गावर सुरू होणार बसफेºया१ डिसेंबरपासून एस.टी. महामंडळाने गोंदिया ते अर्जुनी मोरगाव दरम्यान तीन बसफेºयांचे आदेश निर्गमित केले आहेत. यात गोंदिया येथून सकाळी ९.३०, दुपारी २.१५ व सायं.६.४५ वाजता अर्जुनी मोरगावसाठी बसफेºयांचे नियोजन केले आहे. अर्जुनी मोरगाव येथून गोंदियासाठी सकाळी ७, दुपारी ११.४५ व सायं.४.३० वाजता अशा सुविधा असल्याचे सांगण्यात आले. गोंदिया येथून सकाळी ९.३० वाजता बस सुटणार आहे. त्यापूर्वी सकाळी ७ व सकाळी १०.२० ची रेल्वे सुविधा आहे. सायं.६.४५ वाजता गोंदिया येथून बस सुटणार आहे. त्या दरम्यान सायं.५.१५ व रात्री ७.१० वाजता रेल्वे सुविधा आहे.
जिल्हा मुख्यालयाशी तालुक्याची नाळ जुळणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:22 PM
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालयाशी अर्जुनी-मोरगाव तालुकास्थळाची नाळ जुडलेली नव्हती.
ठळक मुद्देरा.प.महामंडळाचे संकेत : १ डिसेंबरपासून तीन बसफेºया सुरु होणार