सिहान राजन पिल्ले ७ डॉन ब्लक बेल्ट, इंटर नॅशनल इन्स्टटर सेंसाई सुनील शेंडे ४ डॉन ब्लॅक बेल्ट, सेंसाई गौतम गोडबोले ३ डॉन ब्लॅकबेल्ट यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्याना बेल्ट आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे १ ब्राऊन बेल्ट अनुज शहारे, २ ऑरेज बेल्ट श्रेयांश बारेवार, हर्षल अंबुले आणि १७ विद्यार्थी येलो बेल्ट याचिका झरारिया, संजना शहारे, अनाईशा गेडाम, परिधी मलेवार, समीक्षा पटले, भवी भगत, आर्या झरारिया, तक्षील सोनेवाने, श्रुती गभणे, लिखीत येडे, ईश्वरी गभणे, लक्की पटले, अतुल बिनझाडे, वेदांत चौहान, लक्की घोलपे, प्रियांशु साखरे, रुद्राक्ष झेलकर यांनी कराटे बेल्ट स्पर्धेत भाग घेतला होता. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक एसडीबी विद्यालयाचे संस्थापक शिवशंकर बोपचे, डॉ. संगीता बोपचे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री टेंभरे तसेच व्यवस्थापिका अनिता बघेले, क्रीडा व कराटे प्रशिक्षक सेंसाई अमन नंदेश्वर आणि इतर शिक्षकवृंद यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
जिल्हास्तरीय कराटे बेल्ट परीक्षा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:26 AM