लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन-तीन दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा एंट्री मारली आहे. त्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाने सुरूवात केली रात्रभर बरसलेल्या पावसामुळे जिल्हा ओलाचिंब झाला आहे. विशेष म्हणजे, या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. शिवाय गुरूवारी (दि.८) जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता.जुलै महिन्यातील शेवटपासून सुरू असलेल्या पावसाने दोन-तीन दिवसांपासून उघाड दिली होती. त्यानंतर बुधवारी (दि.७) सकाळपासूनच पावसाने सुरूवात केली. दिवस व रात्रभर बरसलेल्या या पावसामुळे जिल्हा ओलाचिंब झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतही पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.तालुक्यातील खमारी मंडळात ६७ मिमी पाऊस बरसल्याने अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे.या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच खूश असून शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. तालुक्यात आजही काही भागांत रोवणी झालेली नसल्याने शेतकरी पावसाचा फायदा घेत रोवणीसाठी जुंपल्याचे दिसले. रिमझीम बरसत असलेल्या या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती नसली तरीही गुरूवारी (दि.८) जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता. अवघ्या जिल्ह्यातच हा पाऊस बरसत असला तरीही अपेक्षेच्या तुलनेत पाऊस कमी आहे.जिल्हयात आतापर्यंत सरासरी ७८६.११ मिमी पाऊस बरसणे अपेक्षित असताना आतापर्यंत सरासरी ५५४ मिमी पाऊस बरसल्याची नोंद आहे. म्हणजेच आजही सरासरी २३२ मिमी पावसाची तूट जिल्ह्यात कायम आहे. पावसामुळे रजेगाव येथील बाघनदीच्या लहान पुलाच्या १ मीटर वरून पाणी वाहत आहे. तसेच २४ तासांत अत्यधिक पावसाचा इशारा देण्यात आला असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पुजारीटोलाचे गेट उघडण्याची शक्यताअवघ्या जिल्ह्यात बरसत असलेल्या या पावसामुळे नदी-नाल्यांना पाणी आले असून जिल्ह्यातील पुजारीटोला प्रकल्पातही गुरूवारी दुपारपर्यंत ७१ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानंतरही पाऊस सुरूच असल्याने सायंकाळपर्यंत पाणीसाठा वाढणार व पुजारीटोला प्रकल्पाचे गेट उघडले जाणार असल्याची शक्यता विभागाने वर्तविली.
जिल्हा ओलाचिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 12:01 AM
मागील दोन-तीन दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा एंट्री मारली आहे. त्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाने सुरूवात केली रात्रभर बरसलेल्या पावसामुळे जिल्हा ओलाचिंब झाला आहे. विशेष म्हणजे, या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
ठळक मुद्देगुरूवारी रेड अलर्ट : प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ