लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २६० राईस मिल असून येथे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र यामुळे किती प्रमाणात प्रदूषण होत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे प्रदूषणाचे मोजमाप करण्याची यंत्रणाच नसल्याची बाब पुढे आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाची कधी तपासणी केली हे उपप्रादेशिक प्रदूषण अधिकाऱ्यांनाही माहिती नसल्याची बाब सुध्दा पुढे आली आहे.रेड मार्क असलेल्या उद्योगांची महिन्यातून दोन वेळा तपासणी करून त्या संदर्भात सूचना संबंधित कंपनीला दिली जाते. गोंदियात अदानी व टीम फेरो या दोन उद्योगांची तपासणी दर महिन्याला केली जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यात २६० राईस मिल असून यांची प्रदूषण नियंत्रण तपासणी झालीच नाही. राईस मिल मधून फक्त धान भरडाई करुन तांदूळ बनविणाºया २०० तर उष्णा राईस तयार करणाºया ६० राईस मिल आहेत. तांदूळ तयार करण्याºया राईस मिल यांना प्रदूषण मंडळ प्लेन मिल तर उष्णा तांदूळ काढणाºया मिलांना पॅरामीट राईसमिल म्हणून संबोधतात.या राईस मिलमुळे जल व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते. या राईस मिलपासून होणाºया प्रदूषणाची गुणवत्ता मोजणारे यंत्र शहरात नाही. गोंदिया जिल्हाची निर्मिती होऊन २० वर्षे होत असताना गोंदियात प्रदूषण वाढत आहे. मात्र येथे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय नाही. किंवा प्रदूषण मोजणारे केंद्रही नाही. प्रदूषण मोजणारे केंद्र शासनातर्फे देण्यात आले नाही. परंतु त्या दिशेने प्रस्तावही पाठविण्यात आला नाही. दिवसेंदिवस गोंदियात वाहनांची संख्या वाढत असून चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या दीड लाखांवर पोहचली आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होणे साहजिकच आहे. परंतु राईस मिलमधून निघणारा प्राणघातक वायू दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुध्दा दुुर्लक्ष करीत आहे. प्रदूषण मोजणाºया केंद्रासाठी संबंधीत विभागाकडून तसा प्रस्तावही पाठविण्यात आलेला नाही.
पावसाळयात निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेत नगर परिषदेच्या माध्यमातून मान्सून पूर्व सफाई अभियान राबविले जात आहे. यांतर्गत नाल्यांची सफाई केली जात आहे. याशिवाय लवकरच एक विशेष बैठक घेवून मान्सूनसाठीचे नियोजन केले जाणार आहे. शहरवासीयांना त्रास होवू नये यादृष्टीने स्वच्छता विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.- अशोक इंगळे, नगराध्यक्षपावसाळयात शहरवासीयांना त्रास होतो ही बाब खरी आहे. मात्र यंदा शहरवासीयांना या त्रासापासून दिलासा मिळावा यासाठी नगर परिषद प्रशासनाने एक महिना पूर्वीपासून कामाला सुरूवात केली आहे. मॉन्सून पूर्व सफाई अभियान राबविले जात असून शहरातील नाल्यांवर प्रामुख्याने लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय स्वच्छता विभागाची बैठक घेऊन सर्वांना आवश्यक त्या उपाय योजनांबाबत निर्देश देण्यात आले आहे.- चंदन पाटील, मुख्याधिकारी