विनोद अग्रवाल : सेंदरीटोला येथे भाजपची शेत शिवार सभा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाची सरकार गरिबांना समृद्ध बनवून त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने मग्रारोहयोतून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करवून देत आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात क्षेत्रात पांदण रस्ते, शेत तलाव, वृक्षारोपण आदी कामांसह वैयक्तिक लाभाच्या योजनांतून कृषी, सिंचन, गोठे बांधकाम, शौचालय सारखे विविध कार्य मनरोगातून करून गरिबांना लाभान्वीत केले जात आहे. जिल्ह्यात शंभर कोटी पेक्षा जास्त रूपयांचा रोजगार मनरेगाच्या माध्यमातून लोकांना मिळाला असून विशेष म्हणजे, मनरेगातून रोजगार देण्यात देण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले. पिंडकेपार जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत सेंदरीटोला येथे शेत शिवार सभेत ते बोलत होते. याप्रसंगी कमलेश सोनवाने, बल्ली शरणागत, तूलाराम पटले, तेजलाल शरणागत, राजू मस्के, अनील पटले, रमेश बिसेन व अन्य उपस्थित होते. पुढे बोलताना अग्रवाल यांनी, भाजपचा उद्देश गावांचा विकास असून प्रत्येकाच्या हाती काम असावे, तेथील शेतकरी समृद्ध असावा हा संकल्प घेत काम करीत आहे. मनरेगाच्या माध्यमातून तालुक्यात सन २०१६-१७ मध्ये कूशल व अकू शल कामांतर्गत १० लाख ८८ हजार ६३५ मनुष्य दिवस रोजगार निर्मिती करण्यात आली आहे. यात सुमारे १३ कोटी ८७ लाख ४३ हजार ४९९ रूपये खर्च करण्यात आले. तर सनसन २०१७-१८ मध्ये ४ लाख ६६ हजार ६० मनुष्य दिवस रोजगार निर्मिती करण्यात आली असून यावर सुमारे ५ कोटी ६६ लाख ७४ हजार ६३५ रूपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. याप्रसंगी त्यांनी महिलांना सहायक कामगार आयु्क्त कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन केले. तसेच उज्वल गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना व शौचालय बांधकाम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तर जुलै २०१६ मधील कामाचे अडकून पडलेल्या वेतनाच्या प्रकरणी अग्रवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून एका महिन्यात वेतन देण्यास सांगीतले. सभेला मोठ्या संख्येत महिला व पुरूष उपस्थित होते.
मनरेगातून रोजगार देण्यात जिल्हा अव्वल
By admin | Published: June 25, 2017 12:56 AM