लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आजच्या युगात विविध क्षेत्रात दिव्यांगांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दृष्टीबाधित महिलांनी आपल्यामध्ये आंतरिक ऊर्जा निर्माण करावी. मतदानाचा अधिकार आपले मूलभूत अधिकार असून मतदानाचे हक्क बजावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.नॅब युनिट महाराष्ट्र व युडीआयएस फोरम कोर्इंबतूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मरारटोली येथे शनिवारी आयोजित कार्यक्र मात त्या बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक शशिकांत जे.चवरे, युडीआयएस फोरम कोर्इंबतूरचे व्यवस्थापकीय संचालक एस.सेकरन, समरस्स पंडियन, नाशिकचे उपाध्यक्ष सूर्यभान साळूंखे व सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जि.प.जिल्हा समाज कल्याण अधिकारी एम.आर.रामटेके, गोंदियाचे तहसीलदार राजेश भांडारकर उपस्थित होते. शशिकांत चवरे यांनी प्रास्तावीकातून दृष्टीबाधित महिलांच्या समस्या सक्षम महिलांच्या तुलनेत कशा वेगळयÞा आहेत यावर भर दिला. राजा दयानिधी यांनी दिव्यांगांच्या कल्याणार्थ कायद्यासोबत मानवियतेची जोड आवश्यक आहे. यावर प्रकाश टाकत दिव्यांगांनी न चूकता मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाज कल्याण अधिकारी एम.आर.रामटेके यांनी दिव्यांगाच्या शासनाद्वारे संचालित अनेक योजनांचा आढावा या वेळी सादर केला. राजेश भांडारकर यांनी निवडणूक आयोगाने दिव्यांगानी सुलभपणे मतदान करावे या हेतूने उपलब्ध सवलती बाबत मार्गदर्शन केले. एकदिवस्ीाय कार्यशाळा उत्तरपूर्व महाराष्ट्रातील दृष्टीबाधित महिलांच्या जनजागृतीच्या हेतूने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मुंबई, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यातील दृष्टीबाधित महिलांनी सहभाग घेतला. राजेश एस.आसुदानी, अॅड. प्रिती तुरकर, प्रा.रोशन मडामे व डॉ. सविता बेदरकर यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले. कार्यशाळेला ६० दृष्टीबाधित महिलांसह इतरही दिव्यांग पुरुष व महिलांचा समावेश होता. कार्यशाळेचे औचित्य साधून २०१६ च्या दिव्यांग अधिनियमाची प्रत दृष्टीबाधित महिलांना मोफत देण्यात आली. कार्यशाळेसाठी निरूषा चवरे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
दिव्यांगानी मूलभूत अधिकार म्हणून मतदान करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 9:00 PM
आजच्या युगात विविध क्षेत्रात दिव्यांगांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दृष्टीबाधित महिलांनी आपल्यामध्ये आंतरिक ऊर्जा निर्माण करावी. मतदानाचा अधिकार आपले मूलभूत अधिकार असून मतदानाचे हक्क बजावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : मरारटोली येथे कार्यशाळा, विविध जिल्ह्यातील दिव्यांगांची उपस्थिती