शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

पोलीस पाटलांचे दिवाळी मिलन व सत्कार

By admin | Published: November 24, 2015 2:25 AM

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व

सडक-अर्जुनी : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील पोलीस पाटलांचे दिवाळी मिलन व सत्कार समारंभ बौद्ध स्मारक भूमी खोडशिवनीच्या पटांगणावर पार पडले.याप्रसंगी संघटनेचे नवनियुक्त राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, महासचिव श्रीकृष्ण साळूंखे पाटील, गोंदिया जिल्हा अध्यक्ष सोमाजी शेंडे, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष हरिहर खरकाटे, भंडारा जिल्हा अध्यक्ष भोलाराम साठवणे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष योगराज ठाकरे, नागपूर जिल्हा अध्यक्ष विजय घाडगे, सचिव यशवंत ईरदंडे, श्रीराम राऊत, सुरेश मते, शरद ब्राह्मणवाडे, मोहनसिंह बघेल, मनोहरसिंह चव्हाण, किशोर तिडके, हरी पानपट्टे, सरपंच जयेंद्र राऊत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पतिराम परशुरामकर तसेच पाचही जिल्ह्यातील संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.याप्रसंगी राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांनी सांगितले, राज्यातील पोलीस पाटलांच्या न्याय्य मागण्या मंजूर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून त्या मंजूर करण्याचा प्रयत्न करणार. तर भृंगराज परशुरामकर यांनी सांगितले, डिसेंबर महिन्यात संघटनेचे राज्य अधिवेशन नागपूर येथे घेण्याचे निश्चित केले आहे. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. शासनाशी संघटनेची चर्चा अंतिम टप्प्यात असून त्यात मानधन वाढीसह इतर १५ मागण्यांचा समावेश आहे. या अधिवेशनात सर्व पोलीस पाटलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.याप्रसंगी नवनियुक्त राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, महासचिव श्रीकृष्ण साळूंखे पाटील यांचा पूर्व विदर्भाच्या वतीने शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सदर नवनियुक्त राज्य समिती १ जानेवारे २०१६ पासून कार्यभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले आहे.कार्यक्रमासाठी मनोहर डोंगरवार, शालीकराम पटने, पुष्पा उके, गायत्री पवार, भाकरे पाटील, जीवन बोरकर, हरी पानपट्टे, मधूकर पर्वते, कवळू हलमारे, टिकाराम कापगते, प्रविण कोचे, कैलाश बडोले, नर्मदा चुटे, साहेबलाल बन्सोड, भांडारकर पाटील, कुंजिलाल भगत व सर्व उपशाखांच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले.