लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यात धानपिकांवरील कीडरोगांमुळे व परतीच्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धानपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन नुकसान भरपाई व पीक विम्याची रक्कम देण्यात यावी. अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकाºयांच्या नावे दिलेल्या निवेदनातून केली आहे.माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या नेतृत्वात राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील सरपंच, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.कमी पावसामुळे अनेक शेतकºयांची शेतजमीन पडीक राहिली. ज्याठिकाणी रोवणी झाली, त्याठिकाणी तोंडाशी आलेला धान परतीच्या वादळी पावसाने हिरावून घेतला. धानाचे लोंब अंकुरित झाले. कीडरोग व तुडतुड्यामुळे धानाची तणस झाली. महागडी कीटकनाशके फवारणी करुन सुध्दा कीडरोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हताश झाल्याचे चित्र आहे. निसर्गाचा प्रकोप व रोगाचे आक्रमण झाल्यावरही पिकविमा कंपनीचे कर्मचारी, अधिकारी यांनी याची साधी दखलही घेतलेली नाही. सध्या धान कापणी सुरु झाली असली तरी कुणीही पंचनामे करण्यासाठी बांधावर पोहोचले नाही. धानावरील कीडरोगांमुळे शेतकºयांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघण्याची शक्यता कमी आहे. जनावरांच्या चाºयाचे संकट सुध्दा शेतकºयांसमोर उभे ठाकले आहे. तालुक्याच्या प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकºयांचे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकºयांच्या सहनशक्तीचा अधिक अंत न पाहता संबंधित यंत्रणेमार्फत प्रत्येक गावातील शेतकºयांच्या शेताची संयुक्त पाहणी करावी. तातडीने पंचनामे करावे व सरसकट ३० हजार रुपये एकरी नुकसान भरपाई द्यावी. तसेच पिक विमा मिळण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार, सुकराम फुंडे, सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, टिकाराम मेंढे, प्रमोद शिवणकर, मुक्तानंद पटले, रवी क्षीरसागर, संजय रावत, मुलचंद बघेले, कविता रहांगडाले, घनश्याम मेंढे, ललीता परतेती, किशन मेंढे, गोविंद शेंडे, ताराचंद काटेखाये, नामदेव दोनोडे, लखन भलावी, नरेंद्र शिवणकर, सोनवाने, बळीराम फुंडे, उमेदलाल कटरे, शोभेंद्र मेंढे, चैतराम पटले यांचा समावेश होता.
नुकसानीचे पंचनामे तातडीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:59 PM
तालुक्यात धानपिकांवरील कीडरोगांमुळे व परतीच्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
ठळक मुद्देधानपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन नुकसान भरपाई व पीक विम्याची रक्कम देण्यात यावी.