आॅनलाईन लोकमतआमगाव : इन्सूलीन मधुमेहाची सर्वोत्तम औषध आहे. इंजेक्शनद्वारा इन्सूलीन घेण्यास घाबरु नका. ४० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनी वर्षातून एकदातरी तपासणी करावी. मधुमेहाशी आपली मैत्री करा, त्याला घाबरू नका असे प्रतिपादन नागपूर येथील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी केले.येथील फार्मसी कॉलेजमध्ये दिशा संस्थेच्यावतीने आयोजीत मधुमेह मेळावा व चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी आहार तज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होत्या.डॉ. गुप्ता यांनी, सर्वात जास्त मधुमेही चिनमध्ये असून भारताचा दुसरा क्रमांक आहे. दर सहा सेकंदात एका व्यक्तीचा मधुमेहामुळे मृत्यू होतो. तर दर सहा सेकंदात दोन मुधमेही व्यक्तींचा जन्म होतो.टाईप-१ व टाईप-२ तसेच गर्भावस्थेतील मधुमेह हे मधुमेहाचे प्रकार आहेत. टाईप-१ मध्ये दिवसांतून ३ ते ४ वेळा इंसूलीन घ्यावे लागते, टाईप-२ मध्ये ८-१० वर्ष गोळ्या घ्यावा लागतात व नंतर इंसूलीन घ्यावे लागते. तर गर्भावस्थेतील मधुमेहात महिलांना ३-७ महिन्यांच्या दरम्यान मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते, जास्त शुगर असेल तर बाळ दगावण्याची शक्यता असते. भूक लागते, लघवीमध्ये खाज होणे, दातांमध्ये इन्फेक्शन होतो, लघवी द्वारे साखर बाहेर जाणे. असे अनेक प्रकारचे लक्षण आहेत. यासाठी जीवनात व्यवस्थापन करने आवश्यक आहे. आहार, व्यायाम, इन्सूलीन आवश्यक आहे असल्याचे त्यांनी सांगीतले.डॉ. कविता गुप्ता, यांनी प्रत्येकाने संतुलीत आहार घ्यावा. ३-४ तासात खाणे, सतत खाऊ नये, ताज्या भाज्या खायला पाहिजे. अंकुरीत मुंग खावे, सलाद व जास्त प्रमाणात पाणी प्यावे. जेवनात दाळींचा वापर करावा असे सांगीतले. विशेष म्हणजे कार्यक्रमात गोळी व इंसूलीनचा वापर कसा करावा याबाबत पथ नाट्यातून जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमासाठी दिशा संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवाशिष चॅटर्जी, उपाध्यक्ष डॉ. यादव कुदळे, दयानंद कटरे, राकेश गुप्ता, सुखदेव कुरंजेकर, विनोद अग्रवाल, सुरेश मचाडे, आदित्य मिश्रा, विनय अग्रवाल, डॉ. साजीद खान, दिनेश रहांगडाले, प्रदीप नागपुरे, रामचरण वानखेडे, प्रदीप गुप्ता, दिनेश मस्के यांच्यासह अन्य सदस्यांनी सहकार्य केले.
मधुमेहाला घाबरु नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 11:47 PM
इन्सूलीन मधुमेहाची सर्वोत्तम औषध आहे. इंजेक्शनद्वारा इन्सूलीन घेण्यास घाबरु नका. ४० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनी वर्षातून एकदातरी तपासणी करावी.
ठळक मुद्देसुनील गुप्ता : फार्मसी कॉलेजमध्ये पार पडला मधुमेही मेळावा व चर्चासत्र