हर्षल पुंडकरची खंत : लावणी व कथ्थकच्या कोरीओग्राफीतून छोट्या पडद्यावर एन्ट्रीविजय मानकर सालेकसाशास्त्रीय नृत्यकला ही भारतीय संस्कृतीच्या कणा आहे आणि ही कला टिकवून ठेवणे व प्रोत्साहन देणे अत्यावश्यक आहे. दुर्दैवाने याता पाहिजे तसे प्रोत्साहन मिळत नाही, अशी खंत लावणी आणि कथक नृत्याची कोरिओग्राफी करणारा आणि चिकाटीने टीव्हा मालिकेच्या क्षेत्रात एन्ट्री मिळविणारा गोंदिया जिल्ह्याचा सुपूत्र हर्षल पुंडकर याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.हर्षल संतोष पुंडकर हा एक युवक असला तरी त्याला लहानपणापासून मुलींचा पोषाख धारण करणे आवडते. त्यामुळे प्रथमदर्शनी त्याला ओळखणे कोणालाही शक्य होत नाही. शास्त्रीय नृत्यमध्ये आपली कला प्रदर्शित करुन महिला नृत्यांगणांना लाजवेल असे अनेक प्रकारचे कथ्थक व लावणीचे यशस्वी सादरीकरण त्याने केले आहे. शास्त्रीय नृत्य करणाऱ्या मुलांना काय काय अडचणी येतात आणि आधी आपल्यावर हसणारे लोक आता आपल्या कलेसमोर कसे नतमस्तक होऊ लागले आहेत, हे हर्षलने दिलखुलासपणे लोकमतशी केलेल्या चर्चेत सांगितले.सध्या मुंबई येथे लावणी आणि कथ्थक नृत्यकलेच्या कोरीओग्राफीतून यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत असलेल्या हर्षलने २६ वर्षाच्या वयात अनेक अडीअडचणीना तोंड दिले आहे. तो अवघा बारावी विज्ञान पास असला तरी सध्या तो मुंबई येथे चंदीगढ विद्यापीठात नृत्यकलेच्या पदवीचे शिक्षण घेत आहे. तसेच हिंदी-मराठी मालिकांमध्ये कलावंतांसाठी नृत्य दिग्दर्शन करीत आहे. त्यातूनच त्याचे अर्थाजन होत आहे. लाईफ ओके चॅनलवर ‘महादेव’ या मालिकेतील नृत्य दिग्दशर्न पूर्णत: हर्षल पुंडकर याने केले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी नर्तिका माया जाधव आणि कत्थक नृत्यक विशाल कांबळे यांच्यासोबत हर्षलने अनेक वेळा लावणी नृत्य सादर करुन कुणाल म्युझिकसाठी सुद्धा लावणी व कत्थक सादर केले.नृत्य कलेच्या क्षेत्रात पदार्पण कशा प्रकारे झाले याबाबत विचारले असता हर्षल म्हणाला, तीन वर्षाचा असताना त्याला नृत्याची आवड वाटू लागली. प्रथमच ‘जा रे हट नटखट..’ या गाण्यावर त्याने नृत्य केले व ते नृत्य गाण्याच्या तालावर ठीक बसले आणि नृत्याबद्दल आत्मविश्वास वाढला. परंतु मला नृत्यासाठी प्रोत्साहन मिळेल का? हा प्रश्न सारखा उपस्थित होता. कारण कोणतेही आई-वडील आपल्या मुलाला उच्च शिक्षण देवून पगारदार नोकरीवाला बनविण्याचे स्वप्न बघतात. अशात आई सोबत हर्षलने याबाबत चर्चा करीत नृत्य क्षेत्रात जाण्याची व तिथे आपले करिअर बनविण्याची इच्छा प्रगट केली. आई जयश्री पुंडकर यांना नृत्याची आवड आहे. त्यांनी हर्षलला प्रोत्साहित केले व मुलीच्या वेशात सुद्धा तू नृत्य करू शकतो, असे म्हणून बळ दिले. एवढेच नाही तर त्यासाठी योग्य वातावरण निर्माण करुन दिले. अशा आपल्या आईलाच मी आपला नृत्यकलेचा पहिला गुरु मानतो, असे हर्षलने सांगितले.शाळेत शिकत असताना मुलीचा श्रृंगार करुन सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणे जास्त आवश्यक वाटे, पण मुलांसोबत खेळणे व वेळ घालवणे आवडत नसे. त्यामुळे समाजातील लोक अनेक प्रकारे व्यंग करीत चिथावण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु अशात आई-वडील नेहमी पाठीशी राहीले. पुढे या प्रसंगांना अनुसरुन ‘दारवठा’ नावाचा चित्रपट तयार केला, तो चित्रपट मुंबई गोवा परिसरात तसेच देशाबाहेर इतर सहा देशात मागील तीन वर्षापासून चालत आहे. या चित्रपटानंतर सलमान खान, ग्रेसी सिंह, डे.जी. शाह यासारख्या महान कलावंतांच्या सानिध्यात काम करण्याची संधी लाभली असे त्याने सांगितले. मुंबईत चांगले काम मिळाले व उत्पन्नाचे स्त्रोत मिळाले. परंतु स्वतंत्रपणे नृत्यकला प्रदर्शन करण्याची इच्छा असल्यामुळे मुंबईतील काम सोडले. तेव्हा वडील नाराज झाले. दरम्यान दोन वर्षे पुणे परिसरात विविध ठिकाणी भारुड सादर केले. तसेच नृत्यकलेतून पैसे कमविले. त्यावेळी ट्रकवर किंवा कोणत्याही वाहनावरून मुंबई-पुणे प्रवास करायचा, कुठेही रात्र काढायची आणि दिवसभर आपली नृत्यकला सादर करायची, असा दिनक्रम होता. ती वेळ निघून गेली. आज हर्षलला अनेक निर्देशक आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करीत आहेत. लावणी आणि कत्थक नृत्यामध्ये मनोरंजनाच्या पलीकडेही बरेच काही संदेश असतात. धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, पौराणिक कथा व कला कत्थक च्या माध्यमगातून दाखविल्या जातात. एवढेच नव्हे तर कत्थक आणि लावणीतून योगा सुद्धा शिकविता येतो, असे तो म्हणाला. लावणीबद्दल अनेकांमध्ये गैरसमज असतात. तो सुद्धा आपण दूर करु, असे हर्षल म्हणाला.लावणी सादरीकरणात रेकॉर्ड बनविणारआमगावसारख्या छोट्या शहरात एक छोटासा फोटो स्टुडिओ चालविताना आपल्या आई-वडिलांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत केली. या जिल्ह्यात आपल्याला भरपूर प्रेमही मिळाले. ही बाब लक्षात घेता तसेच कलात्मक लावणी व कत्थक शैलीचा विकास होत राहावा म्हणून येणाऱ्या काळात गोंदिया जिल्ह्यात शास्त्रीय संगीत विद्यालय सुरू करण्याची आपली तयारी आहे, असे हर्षलने सांगितले. त्याचप्रमाणे १५ हजार मुलींना लावणीचे प्रशिक्षण देऊन एकाच वेळी एकाच ठिकाणी १५ हजार मुलींसह लावणी नृत्य सादर करण्याचे स्वप्न आहे. २० मिनिटांचे हे लावणीचे सादरीकरण जागतिक रेकॉर्ड बनविणारे ठरेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
शास्त्रीय नृत्यकलेला प्रोत्साहन मिळत नाही
By admin | Published: March 31, 2017 1:24 AM