लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हाधिकाºयांद्वारे ५० टक्केपेक्षा अधिक रोवणी झाल्याची शासकीय टक्केवारी दाखविली जात आहे. परंतु प्रत्यक्षात ३० ते ३५ टक्केपेक्षा अधिक रोवणी झाली नाही. जे पºहे लावण्यात आले ते पाण्याच्या अभावाने हळहळू वाळत आहेत. कृषी विभाग व जिल्हाधिकारी यांनी रोवणीची चुकीची संख्या दाखवू नये. केवळ खरी संख्याच शासनाला पोहोचवावी, असा इशारा आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिला.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आ. अग्रवाल गोंदिया तालुक्यातील सालईटोला, निलागोंदी, सोनपुरी, पोलाटोला, नवेगाव, सोनबिहरी येथील शेतांचा दौरा करून पीक परिस्थितीची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे, तहसीलदार चव्हाण व कृषी विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. दौºयानंतर आ. अग्रवाल बोलत होते.आ. अग्रवाल यांनी , जिल्ह्यातील तलाव, नदी, नाले सर्व कोरडे झाले आहेत. त्यामुळे भविष्यात शेतीसह पशूंचा चारा व पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होणार आहे. त्यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना करण्याची गरज आहे. केवळ सरकारला खुश करण्यासाठी जिल्हा प्रशासन रोवणीची संख्या वाढवून दाखवत आहे व गरीब शेतकºयांचे नुकसान करीत आहे. शेतकºयांना आधीच १० हजार रूपये अग्रीम रक्कम मिळाली नाही. तसेच आॅनलाईन पीकविमा न केल्यामुळे ते अडचणीत आहे. त्यामुळे त्यांना अधिकच आर्थिक अडचण भेडसावणार आहे, असे ते म्हणाले.
रोवणीची टक्केवारी वाढवून सांगू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:23 PM
जिल्हाधिकाºयांद्वारे ५० टक्केपेक्षा अधिक रोवणी झाल्याची शासकीय टक्केवारी दाखविली जात आहे. परंतु प्रत्यक्षात ३० ते ३५ टक्केपेक्षा अधिक रोवणी झाली नाही.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दुष्काळी परिस्थितीची पाहणी