शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कर्जाची परतफेड करु नका!

By admin | Published: February 14, 2017 1:05 AM

तालुक्यातील ज्या महिलांनी कर्ज घेतले आहे व कपंनीने दिले आहे, अशा सर्व कंपन्या परप्रांतीय आहेत. कर्ज दिले कसे? त्यांना अधिकार आहे का?

सुनील सूर्यवंशी : तिरोडा येथील महिला मेळाव्यात मार्गदर्शनतिरोडा : तालुक्यातील ज्या महिलांनी कर्ज घेतले आहे व कपंनीने दिले आहे, अशा सर्व कंपन्या परप्रांतीय आहेत. कर्ज दिले कसे? त्यांना अधिकार आहे का? बचत गट तयार करण्याचे अधिकार त्यांना कोणी दिले? आपल्या राज्यातील एकही कंपनी नाही व रिझर्व्ह बँकची मान्यता नाही. व्याजदर आरबीआय एवढे नसून महिलांची फसवणूक होत असेल तर महिलांनी कर्जाची परतफेड करु नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केले आहे.तिरोडा येथील झरारीया मंगल कार्यालयात तालुकास्तरीय महिला मेळावा घेण्यात आला. या महिला मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी सूर्यवंशी बोलत होते.सूर्यवंशी पुढे म्हणाले, मायक्रो फायनान्स कंपन्यांबाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यात गैरप्रकार आढळल्यास कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करु व तसा अहवाल शासनाला पाठवू, असे सांगून त्यांनी महिलांना आश्वस्त केले. अध्यक्षस्थानी तिरोडा पंचायत समिती सभापती उषा किंदरले होत्या. प्रमुख वक्ते व अतिथी म्हणून अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले, मंदा पराते, अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती अ‍ॅड. टी.बी. कटरे, उपसभापती किशोर पारधी व महिला उपस्थित होत्या. खांदेवाले यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांनी दिलेले कागदपत्र बघून सांगितले की, पैशाची परतफेड करु नका. या कंपनीकडे पैसा आला कुठून व त्यांनी घरोघरी जावून महिलांनाच कर्जाचे वाटप कसे केले? कुणीही महिला त्यांच्याकडे गेली नाही. ज्यांच्याकडे काळा पैसा होता तो पांढरा करण्यासाठी तेही २३ ते २७ टक्के व्याजदराने दिले. एवढा व्याजदर कुठेही नाही. पैसे कुणीही भरु नका. आपण कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाला पाठवित आहो. संपूर्ण पैसे माफ होणार असल्याचे खांदेवाले यांनी महिलांना आवार्जून सांगितले. इतर उपस्थित मान्यवरांनीसुद्धा महिलांना मार्गदर्शन केले. पैसे वसुलीसाठी आले किंवा महिलांना धमकावण्याचा प्रयत्न केला तर पोलिसात तक्रार करावी, असे महिलांचे नेतृत्व करणाऱ्या मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. माधुरी रहांगडाले यांनी सांगितले. सतेच तसी तक्रार माझ्याकडे द्यावी, असे आवाहन महिलांना केले. प्रास्ताविक व संचालन अ‍ॅड. माधुरी रहांगडाले यांनी केले. आभार परवीन शेख यांनी मानले. कार्यक्रमासाठी रूबिना कुरेशी, रानी, अर्चना नखाते, सुनिता पटले, सुनिता पारधी, मंदाकिनी गाढवे व महिलांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)