शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

मन मारून नव्हे मन लावून काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 9:48 PM

खूप जूनी एक कथा आहे. एक ज्योतिषी राजाला सांगता झाला की, तू तीन दिवसात मरणार आहेस. राजाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. त्या ज्योतिषाच्या मित्राला कळताच तो राजदरबारी गेला व भविष्य-कथन केले की, राजा, वेळ खूप कठीण आहे, येत्या एक-दोन दिवसात राजकुमारचा राज्याभिषेक करून घ्या. राजाने या मित्र-ज्योतिषाला खूप सारी दक्षिणा दिली आणि त्याच्या विनंतीनुसार प्रथम ज्योतिषाची फाशीही रद्द केली.

गोंदिया :खूप जूनी एक कथा आहे. एक ज्योतिषी राजाला सांगता झाला की, तू तीन दिवसात मरणार आहेस. राजाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. त्या ज्योतिषाच्या मित्राला कळताच तो राजदरबारी गेला व भविष्य-कथन केले की, राजा, वेळ खूप कठीण आहे, येत्या एक-दोन दिवसात राजकुमारचा राज्याभिषेक करून घ्या. राजाने या मित्र-ज्योतिषाला खूप सारी दक्षिणा दिली आणि त्याच्या विनंतीनुसार प्रथम ज्योतिषाची फाशीही रद्द केली. दोन्ही ज्योतिषांनी एकच भविष्य-कथन करूनही त्याचे परिणाम एकदम परस्पर-विसंगत ठरले.निष्कर्ष काय? गुड बोला गोड बोला!मी नवीन ठिकाणी बदलून गेल्यावर तेथील संपूर्ण स्टॉफची संयुक्त सभा घ्यायचो. त्या सभेत कामकाज प्रक्रि या संबंधात बोलताना आवर्जून सांगायचो की, शासन आम्हा सगळ्यांना पुरेसे वेतन-भत्ते देते, कारण आम्ही विहित, नियत, सोपविलेले काम पूर्ण सचोटी आणि ईमानदारीने करावे म्हणून. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझ्यासोबत आपापले विहित काम करावेच लागेल. त्यात तुम्हाला कोणतीही सवलत वा स्वातंत्र्य मिळणार नाही. पण ते काम कशा पद्धतीने करायचे, म्हणजे मन लावून करायचे की कसे करायचे याचे स्वातंत्र्य मी तुम्हाला देईन. मन लावून काम केल्यास जीवनात आनंद फुलेल आणि मन मारून काम केल्यास बी.पी.,शुगर शी दोस्ती होईल. निवड तुमची असेल. हे सर्व मी अगदी हसत-खेळत सांगायचो. याचा परिणाम असा व्हायचा की, माझ्या कार्यालयात प्रलंबित कामे जवळपास नसायचीच. कारण, गुड बोला गोड बोला!-लखनसिंह कटरे, निवृत्त सहकार जिल्हा निबंधक व साहित्यीक.