बाराभाटी :
गेल्या दोन वर्षांपासून अनेक सामाईक व पात्रता परीक्षा घेण्यात आल्याच नाहीत. तेव्हा डीएड, टीईटी पात्रता परीक्षा, बीएड सामाईक परीक्षा आणि पदव्युत्तर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बीएड अभ्यासक्रम फक्त एक वर्षाचे करावे, असे निवेदन आमदारांमार्फत शिक्षणमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
शिक्षण विभागातील अनेक कामे मागील दोन-तीन वर्षांपासून खोळंबली आहेत. अनेक प्रकारच्या प्रशिक्षण व अभ्यासक्रम परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. पूर्वीच्या शासनाने शिक्षण विभागात फार काही बाबतींमध्ये अनेक प्रशिक्षणार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अनेक बाजूने नुकसान होताना दिसत आहे. कोरोनामुळे अनेक शिक्षित मुले हे घरीच बसून आहेत. अशात आता आहेत, अशात बीएड अभ्यासक्रम फक्त एक वर्षाचा करावा, अशी मागणी आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक मुन्नाभाई नंदागवळी, ग्रामपंचायत सदस्य धम्मदीप मेश्राम, प्रीतम झेमराज रामटेके, प्रभाकर दहीकर, नितीन कांबळे व विद्यार्थ्यांनी केली आहे.