लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा नैसर्गीकदृष्ट्या संपन्न आहे. जिल्ह्यात जैवविविधता व वन्यजीवसृष्टी विपुल प्रमाणात आहे. अनेक पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रे सुध्दा आहे. या स्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) जिल्ह्याातील पर्यटनस्थळांचे मार्केटिंग करावे, असे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.५ ते २५ आॅक्टोबर दरम्यान राज्यातील पर्यटनस्थळांविषयी जनजागृती करण्यासाठी राज्यभर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने पर्यटन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने उपवनसंरक्षक एस. युवराज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक हनुमंत हेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार, सोनाली चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पी.जी. नौकरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, निसर्गप्रेमी डॉ. राजेंद्र जैन, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, एस.टी. आगार प्रमुख जयकुमार इंगोले, कार्यशाळा अधीक्षक नितीन झाडे, एमटीडीसीचे झंझाड, शुभम अग्रवाल,अशोक मंत्री, सुरेश चौधरी, हितेश सव्वालाखे उपस्थित होते.काळे पुढे म्हणाले, जिल्ह्यात वाघ, बिबट, काळे काळविट, विविध प्रजातीचे पक्षी व नैसर्गिक सौंदर्य मोठ्या प्रमाणात आहे. १०० वर्षांपेक्षा जुनी महालासारखी असलेली घरे पर्यटकांना होम स्टेच्या दृष्टीने कशी उपयोगात आणता येईल, यादृष्टीने एमटीडीसीने नियोजन करावे. होम स्टे पर्यटनाला प्राधान्य द्याावे,असे त्यांनी सांगितले.हेडे म्हणाले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे राज्यातील पर्यटनस्थळांच्या प्रचार-प्रसिध्दीचे काम करते. पर्यटन पर्वाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध पर्यटन व तीर्थक्षेत्राला पर्यटकांनी भेट द्यावी. जिल्ह्यात असलेल्या पर्यटनस्थळांना जिल्ह्यातील नागरिकांनी सुध्दा भेट द्यावी. डॉ. जैन यांनी पर्यावरण रक्षणासाठी सायकल टुरिझमची आवश्यकता विषद केली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या पर्यटनस्थळांना पर्यटकांनी भेट दिल्यास स्थानिकांना रोजगार निर्मितीस मदत होणार असल्याचे सांगितले.
पर्यटनस्थळांचे मार्केटिंग करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:05 PM
गोंदिया जिल्हा नैसर्गीकदृष्ट्या संपन्न आहे. जिल्ह्यात जैवविविधता व वन्यजीवसृष्टी विपुल प्रमाणात आहे. अनेक पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रे सुध्दा आहे.
ठळक मुद्देअभिमन्यू काळे : सभेत घेतला आढावा