पत्रातून अग्रवाल यांनी, राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पूर्वी उपचारासाठी कोरोना बाधितांच्या कुटुंबाला अत्यधिक खर्च आला आहे. बहुतांश नागरिकांकडे वैद्यकीय विमान राहत नसून तो असतानाही खजगी रूग्णालयांनी उपचारासाठी नकद पैसे घेतले आहे. शासनाच्या २१ मे २०२० च्या निर्णयानुसार राज्यातील ९० टक्के खाजगी रूग्णालयांनी महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ कोरोना रूग्णांना दिला नाही. उलट एडवांस पैसे घेतल्याशिवाय रूग्णालयात दाखलही केले नाही. एवढेच नव्हे तर शासकीय रूग्णालयातही अनेक रूग्णांना बाहेरून ऑक्सीजन सिलिंडर व रेमडेसिविर इंजेक्शन आणावे लागले. तर काहींना ५० हजार रूपये किंमतीचे डोजीलाझुमैब इंजेक्शनची व्यवस्था करावी लागली.
राज्यात नैसर्गिक आपत्तीने मरणाऱ्यास चार लाख रूपये देण्याची तरतूद आहे. कोरोना महामारी विश्वव्यापी नैसर्गिक आपत्ती असूनगी अद्याप कुणालाही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. असेही अग्रवाल यांनी पत्रातून कळविले आहे.
---------------------------
मध्यप्रदेश प्रमाणे आर्थिक मदत सुरू करा
मध्यप्रदेश राज्याने कोरोना बाधित मृतांच्या कुटुंबाला एक लाख रूपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय व औद्योगीक रूपाने अग्रणी राज्य आहे. तर येथेच कोरोना बाधित व मृतांचीही सर्वाधिक आहे. अशात राज्य शासनाने मदतीचा हात पुढे करून यावर लवकर निर्णय घेत आर्थिक मदतीची घोषणा करावी अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे.