लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : सदैव चर्चेत असलेल्या येथील ग्रामीण रु ग्णालयात नवनवीन प्रकार घडत असतात. येथे तीन वैद्यकीय अधिकारी असूनही रुग्णालयीन वेळेत रुग्णसेवा सोडून डॉक्टर भटकंती करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला. मूकबधिर यंत्रणेला केव्हा जाग येईल हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, आता रूग्णालयातील मंदिरासाठी रूग्णांकडून वसुली केली जात असल्याचे ऐकीवात आहे.बुधवारी महागाव येथील रेवनाथ झोडे नामक रु ग्णाला दाखल करण्यात आले. काही वेळानंतर ते स्वस्थ झाले. रुग्णाचे आप्तेष्ट महागावचे माजी सरपंच त्र्यंबक झोडे हे त्यांना रुग्णालयातून घरी घेऊन जाण्यासाठी तयार झाले. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला सांगितले. मात्र डॉक्टर हजर नसल्याची बाब पुढे आली. झोडे यांनी डॉक्टरला फोन करून बोलाविण्यासाठी परीचारिकेला सांगितले. मात्र डॉक्टर फोन स्वीकारत नव्हते. यावर झोडे यांनी प्रयत्न केला पण डॉक्टरांनी त्यांचाही फोन स्वीकारला नाही. शेवटी झोडे त्यांनी पत्रकारांना फोन केला व तोपर्यंत डॉक्टर रुग्णालयात आलेच नव्हते. काही वेळानंतर डॉक्टरांचा झोडे यांना फोन आला व डॉ. सूर्यवंशी हजर झाले. शेवटी तब्बल अडीच तासानंतर रुग्णाला डिस्चार्ज करण्यात आला. ही बाब अजिबात नवीन नसून असे प्रकार येथे यापूर्वी अनेकदा घडले आहेत.विशेष म्हणजे, रुग्णालय परिसरात असलेल्या संत गजानन महाराज मंदिराच्या बांधकामासाठी रुग्णांकडून चक्क वर्गणी घेतली जात असल्याचे उजेडात आले आहे. येथे मंदिर गेल्या पाच वर्षांपासून सुव्यवस्थित आहे. बांधकाम अथवा विस्ताराची आवश्यकता वाटत नाही. मग वसूल करण्यात येत असलेल्या पैशांचा वापर कुठे होतो ? हा प्रश्न निरुत्तर आहे. रु ग्णालयातील रु ग्णांना भोजन पुरवठा करणारा पुरवठादार रुग्णांकडून देणगी वसूल करीत असल्याची बाब पुढे आली आहे. ही वसुली रुग्णालय प्रशासनाच्या संमतीशिवाय होऊच शकत नाही अशा चर्चा आहेत.महागाव येथील पपिता दिलीप नेवारे ही महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली. सीझर आॅपरेशनसाठी सीबीसी चाचणी करावी लागते. ही चाचणी या रुग्णालयात होते. मात्र या चाचणीचे रुग्णाच्या पतीकडून ५०० रु पये घेण्यात आल्याची तक्र ार करण्यात आली आहे.फ्रेश व्हायला घरी गेलोया रु ग्णालयात तीन वैद्यकीय अधिकारी आहेत. २४ तास डयुटी करावी लागते. फ्रेश होण्यासाठी घरी गेलेलो होतो. आपातकालिन रु ग्ण आल्यास परीचारिकेच्या संदेशानंतर लगेच हजर होतो अशी माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली. तीन डॉक्टर असताना २४ तासांची ड्युटी का करावी लागते ? या प्रश्नावर मात्र ते निरुत्तर झाले. ८ तासांची ड्युुटी प्रत्येक डॉक्टरने करणे अपेक्षित आहे. मात्र येथे आठवड्यातून दोन - दोन दिवस ड्युटी करायची व इतर दिवशी बुट्टया मारल्या जात असाव्यात असे या घटनेवरून दिसून येत असल्याचा आरोप झोडे यांनी केला आहे.
रुग्णालयातील मंदिरासाठी रुग्णांकडून देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 6:00 AM
बुधवारी महागाव येथील रेवनाथ झोडे नामक रु ग्णाला दाखल करण्यात आले. काही वेळानंतर ते स्वस्थ झाले. रुग्णाचे आप्तेष्ट महागावचे माजी सरपंच त्र्यंबक झोडे हे त्यांना रुग्णालयातून घरी घेऊन जाण्यासाठी तयार झाले. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला सांगितले. मात्र डॉक्टर हजर नसल्याची बाब पुढे आली. झोडे यांनी डॉक्टरला फोन करून बोलाविण्यासाठी परीचारिकेला सांगितले.
ठळक मुद्देरु ग्णसेवा सोडून डॉक्टरांची भटकंती : रूग्णांकडून फाडली जाते पावती