लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२७) तालुक्यातील धोबीटोला येथे उघडकीस आली.डेव्हीड खिलेश पुंडे (दोन वर्ष पाच महिने) आणि चहल खिलेश पुंडे (९ महिने) अशी संशयास्पद मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. प्राप्त माहितानुसार मंगळवारी (दि.२६) रात्री ८.३० ते १० वाजता दरम्यान दोघेही चिमुकले घरी झोपले होते. दरम्यान त्यांच्या पालकांनी त्यांना औषध देण्याकरिता उठविले. पण त्यांनी कुठलीच हालचाल केली नाही. त्यामुळे त्यांना ठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना आमगाव येथील ग्रामीण रुग्णालय आमगाव नेण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकाºयांनी दोन्ही चिमुकल्यांना मृत घोषित केले. ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणीची सोय नसल्याने त्यांना बुधवारी (दि.२७) गोंदिया येथील के.टी.एस.जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर या घटनेची वार्ता सर्वत्र पसरली. दरम्यान या प्रकरणी आमगाव पोलिसांनी ५६/०१७ कलम १७४ नुसार नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम घंटे करीत आहेत. दरम्यान या दोन्ही चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यावरुन गावात विविध चर्चा आहेत.
धोबीटोला येथे दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 10:18 PM
दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२७) तालुक्यातील धोबीटोला येथे उघडकीस आली. डेव्हीड खिलेश पुंडे (दोन वर्ष पाच महिने) आणि चहल खिलेश पुंडे (९ महिने) अशी संशयास्पद मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
ठळक मुद्देदोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू