लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : मागील १५ दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने बुधवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे घरांच्या भिंती, गोठे, झाडे व वीज खांब कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विद्युत तारा तुटल्यामुळे या परिसरातील वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता. त्यामुळे गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागली.बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक ढग दाटून आले त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.पावसासह वारा देखील असल्याने झाड व विजेचे खांब कोसळूृन पडले. तर काही नागरिकांच्या घरात पाणी साचले. त्यामुळे त्यांची धावपळ उडाली होती. काही नागरिकांच्या घराच्या भिंती कोसळल्या व गोठे पडल्याने मोठे नुकसान झाले.सुदैवाने यात कुठलीही प्राणहानी झाली नाही. पावसामुळे जगदीश दसरीया यांच्या घराची भिंत गणेश पाटील माहुले यांच्या गोठ्यावर कोसळली. त्यामुळे गोठा जमिनदोस्त झाला.पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.आपकारीटोला येथे घरात पाणी शिरलेशेंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आपकारीटोला येथील काही लोकांच्या घरी बुधवारी (दि.१५) सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसाचे पाणी आपकारीटोला येथील उदाराम टेकाम (८०) व लिला टेकाम यांच्या घरात साचले. चारही छपऱ्यांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले. तलाठ्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी उदाराम टेकाम व लिला टेकाम यांनी शासनाकडे केली आहे.
पावसामुळे घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 8:55 PM
मागील १५ दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने बुधवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे घरांच्या भिंती, गोठे, झाडे व वीज खांब कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
ठळक मुद्देशेंडा परिसरात जोरदार पाऊस : नुकसानग्रस्तांकडून भरपाईची मागणी