डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाकडून जून २०२१ या कालावधीत कोरोना महामारी दरम्यान गरजू व्यक्तींना मास्क, सॅनिटायझर, बिस्कीट वाटप तसेच जनजागृती करून कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव कसा करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषदेच्या डिपार्टमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून केलेल्या कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यात संस्था सचिव राजकुमार मळामे तसेच विक्रांत मळामे यांचे सहकार्य लाभले. सन्मानित केल्याबद्दल प्राचार्य टी. जी. गेडाम, प्रा. सीमा जवादे, तुषार गेडाम, प्रा. सुयोग गजभिये, प्रा. किशोर मेंढे, प्रवीण राऊत, तथागत गजभिये, राहुल तागडे, मनोज हेमणे, प्रभाकर भैसारे, वसंत साखरे, सागर मेश्राम, आनंद वंजारी, कनोजे, सांगोळे, डोंगरे, गीता नंदेश्वर, प्रियंका भिमटे यांनी शिक्षा परिषदेचे आभार मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:32 AM