लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : शासकीय सेवेत कार्यरत असताना सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य सेवेत कोणतीही कसर न सोडता आरोग्य संबंधाचे विविध शिबिर आयोजित करुन गरजूंचा लाभ मिळवून देणारे येथील जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे यांचा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, खंडविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे, वनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले, तालुका भाजप अध्यक्ष उमाकांत ढेंगे, सरपंच राधेशाम झोळे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील सामान्य जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळावा म्हणून ते सतत प्रयत्नशील असतात. रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिर, नेत्ररोग निदान शिबिर, महिला आरोग्य शिबिर, रोगनिदान शिबिर, सिकलसेल तपासणी मुक्त गाव मोहिम, डेंग्यु-मलेरिया जनजागृती मोहिम, स्वच्छता तिथे आरोग्य शिबिर, कुपोषण मुक्त गाव मोहीम, शौचालय व हागणदारी मुक्त गाव मोहिम असे विविध लोक हितार्थ उपक्रम राबविण्यात त्यांचा हातखंडा आहे. अनाथ मुलांचा वस्तुसाठी तसेच आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येतात. सामाजिक नाट्य अभिनयातून एका उत्तम कलाकाराची भूमिका वटविण्याचा त्यांचा छंद वाखाण्यासारखा आहे.
डॉ.कुंदन कुलसुंगे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:36 AM