शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

द्रोणाचार्यालाच अंगठा मागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:53 AM

ढिवर, कहार, कोळी, भोई या जातीतील लोक अशिक्षित, अज्ञानी, गरिबीच्या स्थितीत जीवन जगत आहेत. इतर गर्भश्रीमंत लोक आपल्यावर अन्याय-अत्याचार करतात. त्यामुळे समाजातील लोकांनी जागृत व्हावे.

ठळक मुद्देदिनानाथ वाघमारे : पुतळा अनावरणप्रसंगी आधुनिक एकलव्य होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : ढिवर, कहार, कोळी, भोई या जातीतील लोक अशिक्षित, अज्ञानी, गरिबीच्या स्थितीत जीवन जगत आहेत. इतर गर्भश्रीमंत लोक आपल्यावर अन्याय-अत्याचार करतात. त्यामुळे समाजातील लोकांनी जागृत व्हावे. आपले पूर्वज एकलव्य यांनी जसे गुरूदक्षिणा म्हणून अंगठा दिला, तसा अंगठा आता समाज बांधवाने कोणत्याही द्रोणाचार्याला देवू नये. उलट आधुनिक एकलव्य बणून तुम्ही त्याला अंगठा मागा, असे प्रतिपादन संघर्ष वाहिनीचे संयोजक दिनानाथ वाघमारे यांनी केले.मुंगली-नवेगाव येथे वीर धनुर्धर एकलव्य यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.सदर पुतळा माजी खा. नाना पटोले यांनी दिला असून तो मूर्तीकार सोनवाने (प्रतापगड) यांनी तयार केला. उद्घाटन किशोर तरोणे यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून मत्स्यजीवी संघ नवी दिल्लीचे माजी संचालक संजय केवट व अतिथी म्हणून मनोहर चंद्रिकापुरे, के.एन. नान्हे, अशोक शेंडे, सरपंच नाजुका कोडापे, उमराव मांढरे, यशवंत दिघोरे, वासुदेव खेडकर, नरले, चाचेरे, उपसरपंच बाबुलाल भैसारे उपस्थित होते.वाघमारे म्हणाले, संपूर्ण भारतात १७ टक्के लोक सदर समाजातील आहेत. ते अतिशय दारिद्र्यात जीवन जगत आहेत. सरकार कधी जागे होईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.इंजि. केवट आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, भटक्या जाती, विमुक्त जमाती या प्रवर्गांतर्गत अतिशय अज्ञानी, दारिद्र्य भटके जीवन जगणारे लोक असून आम्हाला अनुसूचित जाती-जमातीमध्ये सरकारने समाविष्ट करावे. त्यामुळे या समाजाची आर्थिक उन्नती होईल. मात्र असे न करता सरकारने उलट एनटीचे व्हीजेएनटी, एनटी-बी, एनटी-सी., एनटी-डी असे चार गट करून समाजाचे पाय तोडले. असे गट रद्द करुन सरकारने या समाजाला सामाजिक, राजकीय आरक्षण द्यावे, असे ते म्हणाले.सकाळी संपूर्ण मुंगली गावात स्वच्छता अभियान व प्रभातफेरी काढण्यात आली. त्यांतर पुतळा अनावरण व महाप्रसाद वितरण करण्यात आले. तर रात्रीला मुलामुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.कार्यक्रमासाठी नंदलाल कोल्हे, राजू कांबळे, हरिचंद्र कोल्हे, विजय मेश्राम, प्रदीप मेश्राम, मोहन मेश्राम, ईश्वर मेश्राम, श्यामराव ठाकरे, विश्वनाथ मेश्राम, दुधराम कांबळे यांनी सहकार्य केले.