शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

दुष्काळग्रस्त शेतकरी आर्थिक मोबदल्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:45 AM

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने १३ हजार ५०० ते १८ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई दिल्याचे मोठमोठे फलक लावून भाजपा नेत्यांनी श्रेय लाटले. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात केवळ हेक्टरी १ हजार ते १५०० रुपयांचा मोबदला मिळाला.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने १३ हजार ५०० ते १८ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई दिल्याचे मोठमोठे फलक लावून भाजपा नेत्यांनी श्रेय लाटले. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात केवळ हेक्टरी १ हजार ते १५०० रुपयांचा मोबदला मिळाला. स्थानिक भाजपा नेते केवळ श्रेयाचे राजकारण करीत असून खोटी माहिती देवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी अद्यापही योग्य आर्थिक मोबदल्यापासून वंचित असल्याचा आरोप आ.गोपालदास अग्रवाल यांनी केला.तालुक्यातील भाद्याटोला-जिरुटोला रस्ता रुंदीकरण कामाच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.शिक्षण सभापती रमेश अंबुले, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, देवेंद्र मानकर, लोकचंद दंदरे, बबीता देवाधारी, कैलाश देवाधारी, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, झनकसिंग तुरकर, कत्तेलाल मातरे, निर्वतीबाई पाचे, दिलीप तुरकर, कपुरचंद पाचे, रामभगत पाचे, कांतीबाई पाचे, नेतलाल मात्रे, केशव नागफासे, महेश देवाधारी, संजय देवाधारी, बालाराम खैरवार, माणिकचंद तुरकर, श्यामराव तुरकर, धनिराम नागफासे उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, बाघनदी परिसरातील सर्व रस्ते चांगले तयार करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.रस्त्यांसह या परिसरातील सिंचन, आरोग्य व नागरिकांच्या इतर समस्या मार्गी लावण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. अंबुले म्हणाले विरोधी पक्षातील आमदारांना शासनाकडून निधी खेचून आणणे हे सोपे काम नाही. मा.आ.अग्रवाल यांनी आपले राजकीय वजन वापरून तालुक्याच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. त्यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यात विविध विकास कामे सुरू आहे. तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल