शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

कर्मचाऱ्यांअभावी महसूलाची कामे खोळंबली

By admin | Published: June 30, 2017 1:26 AM

महसूल विभागात वाढता कामाचा बोजा असतानाच तहसीलदारांकडे नगर पंचायतचे प्रशासक म्हणून अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : महसूल विभागात वाढता कामाचा बोजा असतानाच तहसीलदारांकडे नगर पंचायतचे प्रशासक म्हणून अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. त्यावर तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची सतत गैरहजेरी दाखवून दुखत्या नाडीवर बोट ठेवण्याचे काम केले जात असल्याचे चित्र सध्या येथील तहसील कार्यालयात बघावयास मिळत आहे. तहसील कार्यालय हा तालुक्याच्या एक सर्वात महत्वाचा विभाग असून सामान्य जनतेपासून प्रत्येक घटकाशी निगडीत महसूल विभाग कामाच्या दृष्टीकोनातून फारच महत्वाचा आहे. परंतु सध्या येथील तहसील कार्यालयाला ग्रहण लागले असून राहू काळात चालत आहे. याचा थेट फटका समाजातील प्रत्येक घटकासह तालुक्यातील नागरिकांवर पडत आहे. येथील तहसील कार्यालयासाठी एक तहसीलदारासह चार नायब तहसीलदारांचे पद मंजूर आहे. यात निवडणूक विभागातील नायब तहसीलदारांचे पद रिक्त आहे. बाकी तीन पैकी संजय गांधी निराधार विभागाशी संबंधीत नायब तहसीलदार डी.के.बारसे देवरी येथे समायोजनावर पाठविण्यात आले आहेत.सामान्य प्रशासनातील नायब तहसीलदार एस.एन.बारसागडे कार्यरत आहेत. परंतु ते नेहमी बेपत्ता राहत असून कोणत्या न कोणत्या कारणाने रजेवर असल्याचे सांगत असतात. आणखी एक नायब तहसीलदार एस.जी.खाडे चार महिन्यांपूर्वी येथे रुजू झाले होते. परंतु सुरुवातीचे काही कार्यालयात हजर राहिल्यानंतर मागील मार्च महिन्यापासून सतत सुटीवर आहेत. त्यामुळे संबंधीत विभागाची कामे खोळंबली असून काही महत्वाच्या व नियमित कामाचा ताण तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या डोक्यावर वाढला आहे. त्यांना अनेक कामे सकाळ पासून उशीरा रात्रीपर्यंत कार्यालयात बसून करावी लागत आहेत. त्याशिवाय साप्ताहिक मासीक बैठका घेणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकांत हजेरी लावणे तसेच नैसर्गिक-अनैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची कामे हाताळणे इत्यादी आकस्मिक कामे केव्हा आणि कोणत्या वेळी येऊन ठेपतील याबाबत सांगता येत नाही. अशात सर्व नायब तहसीलदारांनी लापरवाहीने कर्तव्य बजावणे किती योग्य आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांची पदे सुद्धा रिक्त असल्याने अनेक कामे वेळेवर होताना दिसत नाही. यात अव्वल कारकूनचे तीन पद मंजूर असून त्यात एक पद रिक्त आहे. कनिष्ठ लिपीकाची सात पदे मंजूर असून त्यातील तीन पदे रिक्त आहेत. या व्यतिरीक्त इंदिरा गांधी विधवा पेंशन योजनेत एक पद, संजय गांधी निराधार योजनेत एक पद, पुरवठा विभागात एक पद, शिपाई एक पद रिक्त आहे. अशी एकूण आठ पदे रिक्त असून याचा थेट फटका दैनंदिन कामकाजावर पडत आहे. सध्या विद्यार्थ्यांची वरच्या वर्गासाठी किंवा व्यवसायीक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी धावपळ सुरु असून विविध प्रमाणपत्रांसाठी त्यांना तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. परंतु त्यांची कामे वेळेवर होताना दिसत नाही. दरम्यान तहसीलदार सांगळे इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने किंवा अस्थायी कार्यरत युवकांच्या सहकार्याने जास्तीतजास्त कामे आटोपण्याचा पूरेपूर प्रयत्न करीत आहेत.नगर पंचायतचा अतिरिक्त कारभार अडीच वर्षापूर्वी शासनाने सालेकसा ग्रामपंचायतला नगर पंचायत घोषित केले होते. तेव्हा तहसीलदारांना तात्पुरते प्रशासक नियुक्त करुन न.प.निवडणूक होईपर्यंत कामकाज पाहण्याची जबाबदारी दिली होती. परंतु निवडणूक कार्यक्रम दोन वेळा रद्द झाल्याने मागील अडीच वर्षांंपासून आजही प्रशासकाचा अतिरिक्त कारभार सांभाळावा लागत आहे.