लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील विविध भागातून एकाच दिवशी चार दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.दुचाकी चोरटे गर्दीच्या ठिकाणी असलेल्या अस्ताव्यस्त वाहनांवर करडी नजर ठेवून त्या गाडी मालकाची नजर चुकवून मोटारसायकल चोरुन नेत आहेत. मात्र दुचाकी चोरटे अद्यापही पोलिसांच्या हातात लागले नाहीत. चोरलेल्या मोटारसायकलचा क्रमांक काढून ते वाहन राजरोसपणे शहरात किंवा जिल्ह्यात चालविल्या जातात. चोरलेल्या वाहनांवर बोगस क्रमांक लावून ते वाहन नेहमी वापरण्यात येत असते. गोंदिया शहरातून सर्वात जास्त वाहने चोरीला जातात. बेशिस्त असलेल्या पार्र्कींगचा फायदा घेत ते वाहन चोरण्यास चोरट्यांना सहज शक्य होते. हँडल लॉक केलेली वाहने दिवसाढवळ्या पळविण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत.जुन्या मास्टर किल्लीने हँडल उघडले जाते किंवा काही वाहनांचे हँडल झटका मारल्यावर तुटत असल्याने ते लॉक तोडून वाहने पळवून नेली जात आहे.५ रूपयांसाठी बसतो ५० हजारांचा भुर्दंडरेल्वेस्थानकाच्या बाहेर शेकडो गाड्या बेवारस पडलेल्या असतात. रेल्वेस्थानकावर मोटारसायकल ठेवण्यासाठी स्टँड आहे. मात्र ५ रूपये वाचविण्यासाठी वाहन चालक स्टॅन्डवर वाहने ठेवीत नाही. त्यामुळे पाच रुपये वाचविण्याच्या नादात वाहन चोरीला गेल्यानंतर ५० हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो.वाहन चालकांनी हे करावेवाहन चालकांनी नेहमी आपल्या सोबत वाहनाचे कागदपत्र ठेवावे. परंतु ते कागदपत्र वाहनाच्या डिक्कीत न ठेवता स्वत:कडे ठेवावे. वाहनच्या डिक्कीत कागदपत्र ठेवले व ते वाहन चोरीला गेल्यास त्या वाहनाला विकणे आरोपीला सोपे जाते. त्यासाठी वाहनाच्या डिक्कीत कागदपत्र ठेवू नये. चोरीची वाहने जात असताना पोलिसांना ओळखता येत नाही त्यासाठी प्रत्येक वाहन चालकाने आरसी बुकची झेरॉक्स तरी आपल्याकडे ठेवल्यास वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी मदत होईल. रात्रीच्या वेळी आपल्या घरी वाहन ठेवताना त्या वाहनांना लोखंडी साखळीने बांधून ठेवावे.गर्दीचे ठिकाण चोरट्यांचे ‘लक्ष्य’मोटारसायकल चोरी करणारे आरोपी गर्दीचा फायदा घेत वाहन चोरी करतात. गोंदिया शहरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकल सर्वात जास्त गर्दीच्या ठिकाणातून पळविण्यात आल्या आहेत. रेल्वेस्थानक, बँक परिसर, रूग्णालय, बसस्थानक व बाजार परिसरातून ह्या मोटारसायकल पळविल्या आहेत. गर्दीचा फायदा घेत वाहनाला पळवून नेण्यात चोरटे यशस्वी होतात.
अस्ताव्यस्त पार्र्किंगमुळे वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:42 AM
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील विविध भागातून एकाच दिवशी चार दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.
ठळक मुद्देगर्दीच्या ठिकाणांवर चोरट्यांची नजर : हँडल लॉक केलेली वाहने पळविली