शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

बेंचेसमुळे गोरेगावच्या सौंदर्यात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2017 1:01 AM

येणारा उद्या अधिक उत्तम असावा, या विचाराला साकार करण्यासाठी गोरेगाव येथील गायत्री परिवार पुढे सरसावला आहे.

लोकसहभागातून बैठक व्यवस्था : गायत्री परिवाराचा उल्लेखनीय उपक्रम गोरेगाव : येणारा उद्या अधिक उत्तम असावा, या विचाराला साकार करण्यासाठी गोरेगाव येथील गायत्री परिवार पुढे सरसावला आहे. त्या अंतर्गत स्वच्छता व जलस्रोतांचे शुद्धीकरण तथा सौंदर्यीकरणाचे कार्य केले जात आहे. यात स्थानिक लोकांच्या सहकार्याने २० सिमेंट (गार्डन) बेंचची सोय शहरात ठिकठिकाणी करण्यात आली आहे. यात १५ बेंचेस पवन तलाव परिसरात, दोन बेंचेस गोरोबा काका मंदिर प्रभाग-१४, एक बेंच बाजार चौक गोरेगाव व एक बेंच रविदास स्मारक प्रभाग-९ मध्ये लावण्यात आला. विशेष म्हणजे जवळपास ५० हजार रूपये किमतीचे हे बेंचेस विना शासकीय मदतीने लोकांनी दिलेल्या दानातून लावण्यात आले. पवन तलाव परिसर आतापर्यंत केरकचऱ्याचे माहेरघर म्हणून परिवर्तीत होत होते. तेथे मागील १ जानेवारी २०१७ पासून गायत्री परिवार, दिया संघटना व युवाशक्ती स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दर रविवारी आपली वेळ देवून स्वच्छतेचे कार्य केले जात आहे. अभियंता आशीष बारेवार यांनी सांगितले की, शहरात एकही बालोद्यान नसल्याची तक्रार नागरिक अनेक दिवसांपासून करीत होते. ही समस्या आता काही दिवसातच संपुष्ठात येण्याची शक्यता दिसून येत आहे. तसेच भविष्यात याला आणखी विकसित करण्याची योजना आहे. सदर कार्य लोकसहभागातून करण्यामागे काही हेतू असल्याचे ते म्हणाले. लोकसहभागामुळे लोकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते. त्यामुळे या जागेची देखभाल योग्यरित्या होवू शकेल, असे त्यांनी सांगितले. सिमेंट बेंच दानदात्यांमध्ये आशीष बारेवार, नितीन बारेवार, राहुल कटरे, अरविंद जायस्वाल, रूस्तम येडे, पांडुरंग साखरवाडे, जैन रिसोर्ट गोरेगाव, योगेश बारेवार, हितेश बिसेन, गोपाल हत्तीमारे, सम्मू परिवार, टीटू जैन, विवेक देशमुख, अनिकेत बघेले, मयूर कोरेकर, मार्कंडराव वैद्य, जितेंद्र बिसेन, पवन सोनवाने, शशीकला बागडकर यांचा समावेश आहे. सर्व दानदात्यांचा तथा सर्व स्वच्छता अभियानात सहभाग देणाऱ्यांचा पुरूषोत्तम साकुरे, भाऊलाल गौतम, संजय बारेवार, संजय घासले व गायत्री महिला मंडळाने आभार व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)