गोपालदास अग्रवाल : जि.प. व पं.स. सदस्यांची विशेष सभालोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नियोजनाच्या अभावामुळे एका वर्षात खर्च केला जाणारा निधी दोन -तीन वर्षे प्रलंबित राहातो. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची कार्यप्रणाली दुरूस्त करून विकास योजनांच्या नियोजनासंदर्भात लवकर निर्णय घेतल्यानेत योजना कार्यान्वीत होणार. मात्र विकास योजनांच्या नियोजनातील उशिरामुळे सर्व सामान्य नागरीक त्यांच्या लाभापासून वंचीत राहत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. जिल्हा परिषद सभागृहात आयोजीत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या विशेष सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, पशु संवर्ध विभागावर लक्ष टाकत, दलीत नागरिकांच्या वैयक्तीक लाभाच्या नावीण्यपूर्ण व विशेष घटक योजनांच्या लाभार्थिंची मागील वर्षाची यादी यंदा जुलै महिन्यात मंजूर झाली. आता त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी सन २०१८ येणार. प्रत्येकच विभागातील ही स्थिती असून यामुळेच लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचीत राहत असल्याचे मत व्यक्त केले. आरोग्य विभाग कोट्यवधींच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती उभ्या करीत आहेत. मात्र कित्येक केंद्रांत नर्स व डॉक्टर्सची कमी असून जिल्हा परिषदेने यावर योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. पाणी पुरवठा विभागाच्या लचर कार्यप्रणालीमुळे कित्येक योजना आतापर्यंत अपूर्ण पडल्या असून नवीन योजना सुरू करण्यापूर्वी निर्माणादिन योजना पूर्ण करून नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याचेही ते म्हणाले. यावर जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनी, सर्व विषयांना गांभीर्याने घेत सर्व सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष लाभ पोहविण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सभेला जि.प.आरोग्य सभापती पी.जी. कटरे, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपूरे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प.पक्षनेता रमेश अंबुले, सदस्य विजय लोणारे, शेखर पटेल, विठोबा लिल्हारे, सिमा मडावी, लता दोनोडे, विजय टेकाम, दीपक पवार, माधुरी कुंभरे, उषा शहारे, ज्योती वालदे, गिरीश पालीवाल, सरिता कापगते, माजी पं.स. सभापती स्नेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, सदस्य अनील मते, विनिता टेंभरे, निता पटले व अन्य उपस्थित होते.
नियोजनातील विलंबामुळे नागरिक राहतात वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:55 AM