शेतकऱ्यांना वैफल्यग्रस्त होऊ देऊ नकाविदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी त्यांची व्यसनाधीनता कारणीभूत आहे, असे म्हणणे पूर्णपणे बरोबर नाही. असे म्हणणे ही खरे तर शेतकऱ्यांची थट्टाच आहे. पण आत्महत्येसाठी जबाबदार ठरत असलेल्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे. वास्तविक शेतकऱ्यांना व्यसनाधीन होण्यासाठी त्यांच्या वाट्याला वैफल्याची स्थितीच येणार नाही याची दक्षता घ्या, असा सूर राज्यकर्त्यांना उद्देशून विचारवंतांनी आवळला.चौथ्या राज्यस्तरिय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात शनिवारी ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना ग्रामीण भागातील व्यसनाधीनता कितपत कारणीभूत?’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन केले होते. यात स्वत: शेती करून शेतकऱ्यांचे दु:ख प्रत्यक्ष अनुभवणारे, प्रसिद्ध नकलाकार आणि नाट्य कलावंत वणीचे प्रा.डॉ.दिलीप अलोणे, यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी चळवळ उभारणारे सामाजिक कार्यकर्ते महेश पवार, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी झटणारे वाशिमचे गजानन अहमदाबादकर, कवी-कीर्तनकार श्यामसुंदर महाराज, ग्रामगीता प्रवचनकार अमरावतीच्या पौर्णिमा सवई आणि सामाजिक कार्यकर्ते अनंत गौर या निमंत्रितांनी सहभाग घेतला. सर्व मान्यवरांनी शेतकऱ्यांची, त्यांच्या कुटुंबियांची विदारक परिस्थिती मांडून त्यांचे दु:ख सर्वांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केला.दिलीप अलोणेचर्चासत्राची सुरूवात करताना प्रा.अलोणे यांनी, राज्यात आणि देशात सर्वाधिक आत्महत्या करणाऱ्या कापूस उत्पादक यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडताना,‘उगाता हू मै कपास तो दुनिया कपडे पहनती है,पर मेरी ही लाख कफन के लिए तरसती है..’अशा शब्दात शेतकऱ्यांची स्थिती वर्णन केली. जर दारूच्या व्यसनामुळे शेतकरी आत्महत्या करीत असतील तर ताबडतोब यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करा, असा सल्ला दिला. वास्तविक केवळ दारूच्या व्यसनामुळे शेतकरी आत्महत्या करीत नाही. १९९० नंतर आलेल्या जागतिकीकरणामुळे शेतकऱ्यांना गिळंकृत करणे सुरू केले. खर्च वाढत गेला, पण त्या प्रमाणात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यातून वैफल्यग्रस्त होऊन तो व्यसनाकडे वळला असेल तर त्याची परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे.दुसरीकडे शेतकरी सांस्कृतिक आक्रमणात अडकला. पूर्वीच्या काळी बाळाला मांडीवर घेऊन सुसंस्कार करणारी आई आता टिव्हीसमोर रिमोट घेऊन बसून सिरीयल्समध्ये वस्त झाली. हे चित्र बदलणे बदलवावे लागेल, असे प्रा.अलोणे म्हणाले.महेश पवारदारूबंदीसाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी दारूला प्रतिष्ठा कोणी मिळवून दिली? असा सवाल करीत त्यांनी ग्रामीण भागातील स्थितीचे वर्णन केले. जर दारूमुळे माणूस व्यसनाधीन होत असेल तर दारूला परवानगीच नको. ज्या सहज पद्धतीने दारू उपलब्ध होते त्याला आळा घातल्या गेला पाहीजे. दारूबंदी केल्याने पूर्णपणे बंदी होत नसली तरी किमान २० टक्के तर दारू कमी होईल. जागतिक अहवालानुसार दरवर्षी जगात ३३ लाख लोक दारूमुळे मरतात. जर अशी परिस्थिती असेल तर सर्व वाईन शॉप, बार बंद करावेत. सरकारने यावर गांभिर्याने विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.गजानन अहमदाबादकरशेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणं सरकारला माहीत नाही असे असू शकत नाही, असे म्हणून अहमदाबादकर यांनी सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकीय मंडळींना निवडणूक जिंकायची असते. त्यासाठी लाखो रुपयांची दारू वाटली जाते. त्यांना दारूची सवय हेच राजकीय लोक लावतात. विवंचनाग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणं शोधत बसू नका. ज्या शेतकऱ्यांनी जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांवर त्या काळी १६३२ कोटी रुपयांचं कर्ज करून ठेवलं तेच शेतकरी आज कर्जबाजारी झाले आहेत.पौर्णिमा सवाईजिजामाता कृषीभूषण पुरस्कार पटकावणाऱ्या आणि राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या पौर्णिमाताईंनी सुद्धा शेतकऱ्यांना देत दिला नाही. दिवसभर राबणारा शेतकरी रात्री दोन घोट घेत असेलही. पण त्यासाठी सरकारचे धोरण चुकत आहे. आजच्या समाजाला आळशी बनविण्याचे काम सरकारी योजना करीत आहे. नेते लोक खालच्या स्तरातील लोकांना सुशिक्षित होऊ देत नाही. त्यांना व्यसनी ठेवण्यात फायदा असल्याचे ते मानतात. वास्तविक शेतकऱ्यांच्या बायकांनी सक्षम व्हावे. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत आजच्या शेतकऱ्यांना व्यसनापासून आणि आत्महत्येपासून वाचविण्याची ताकद आहे. श्यामसुंदर महाराजवास्तविकतेवर आसूड ओढणाऱ्या कवितांनी गाजलेले कवी, प्रवचनकार श्यामसुंदर महाराज यांनी आपल्या तीन कवितांमधील निवडक ओवींमधून शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती मांडली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा नेत्यांसाठी थट्टेचा विषय झाल्याचे ते म्हणाले. पिक येत नाही तर यांच्या बायकांच्या अंगावर दागिने कुठून येतात असे बोलण्यापर्यंत यांची मजल जाते. एसीमध्ये बसून यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नसल्याचे ते म्हणाले. पण शेतकऱ्यांनी वैफल्यग्रस्त होऊन धीर सोडू नये, असा सल्लाही ते देतात.अनंत गौरमोजक्या शब्दात आपले विचार मांडताना गौर यांनी चर्चासत्राचा हा विषयच शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारा असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची अप्रतिष्ठा होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे अनेक कारणं आहेत. हवामान बदलामुळे, औद्योगिकरणामुळे शेतात अपेक्षित उत्पन्न होत नाही. जागतिकीकरण हे कर्जबाजारीपणाचे कारण असून स्वामीनाथन आयोग लागू करावा अशी मागणी त्यांनी केली.
चर्चासत्रात मान्यवरांचा सूर : आत्महत्यांना व्यसनाधीनतेसोबत इतरही अनेक कारणे
By admin | Published: January 24, 2016 1:43 AM